के जे सोमय्या कॉलेज

सोमैया महाविद्यालयाचे डॉ. जिभाऊ मोरे यांच्या ग्रंथास महाराष्ट्र शासनाच्या हिंदी अकादमीचा पुरस्कार

सोमैया महाविद्यालयाचे डॉ. जिभाऊ मोरे यांच्या ग्रंथास महाराष्ट्र शासनाच्या हिंदी अकादमीचा पुरस्कार

सोमैया महाविद्यालयाचे डॉ. जिभाऊ मोरे यांच्या ग्रंथास महाराष्ट्र शासनाच्या हिंदी अकादमीचा पुरस्कार

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ मार्च २०२४कोपरगाव येथील के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील हिंदी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जिभाऊ मोरे यांनी मराठी भाषेतून हिंदी भाषेत अनुवादित केलेल्या ‘महात्मा बसवेश्वर और बोधिसत्व बाबासाहेब डॉ. आंबेडकर’ या ग्रंथास महाराष्ट्र शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीचा मामा वरेरकर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ११ मार्च रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात हिंदी अकादमीचे कार्याध्यक्ष डॉ. शीतलाप्रसाद दुबे, उपाध्यक्ष मंजू लोढा व वरिष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. सुधाकर मिश्रा तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.

जाहिरात

रोख रुपये ११०००/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी प्रो. जिभाऊ मोरे यांचे मार्कंडेय का कथा साहित्य और ग्रामीण सरोकार, हिंदी साहित्य में दलित चेतना, व्यावहारिक हिंदी हे तसेच ०५ (मराठीतून हिंदी भाषेत) अनुवादित ग्रंथ प्रकाशित आहेत. तसेच त्यांचे ३५ शोधनिबंध देखील प्रकाशित असून, ते सावित्रीबाई फले पुणे विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळ व विद्या परिषदेचे माजी सदस्य आहेत. यापूर्वी प्रो. मोरे यांना भारतीय दलित साहित्य अकादमीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप सन्मान, युगधारा फाउंडेशन लखनौचा युगधारा साहित्य गौरव सन्मान, राष्ट्रगुरु  रविदासजी सेवा संघ नाशिकचा साहित्यरत्न आदी पुरस्कार लाभले आहेत.

जाहिरात

प्रो. मोरे मागील ३१ वर्षांपासून स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विद्यार्थ्यांनी पीएच.डी. व दोन विद्यार्थ्यांनी एम. फिल चे संशोधन पूर्ण केले असून सध्या सात विद्यार्थी पीएचडीसाठी संशोधन करीत आहेत. ते सध्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदव्युत्तर हिंदी अभ्यासक्रमात निर्मिती समितीवर कार्यरत आहेत तसेच त्यांनी याच विद्यापीठाच्या  सामाजिक शास्त्र विषयाच्या ३ पाठ्यपुस्तकांचे हिंदी अनुवाद केले आहेत. तसेच काही पाठ्यपुस्तकांचे लेखन व संपादन देखील केले  आहे. प्रो. मोरे यांच्या जळगाव आकाशवाणीवरून हिंदीतून अनेक साहित्यिक वार्ता देखील प्रसारित झालेल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष डॉ. शितलाप्रसाद दुबे व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रो. जिभाऊ मोरे

 सध्या ते महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्राचे समन्वयक म्हणून कार्य करीत असून या संशोधन केंद्रात महाराष्ट्रातील ३० विद्यार्थी पीएचडी पदवीसाठी संशोधन करीत आहेत महाविद्यालयाच्या गोदातरंग वार्षिक अंकाचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रो.मोरे संपादक आहेत. प्रो. मोरे यांच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  अशोकराव रोहमारे, सचिव अॅड्. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीपराव रोहमारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. व्ही. सी. ठाणगे, भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. गणेश देशमुख, रजिस्टर डॉ. अभिजीत नाईकवाडे आदींनी अभिनंदन केले आहे.   

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे