आपला जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा युवक उपाध्यक्षपदी भावेश थोरात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा युवक उपाध्यक्षपदी भावेश थोरात

खासदार शरदचंद्रजी पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून भावेश थोरात यांनी ओळख
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ मार्च २०२४राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी नुकतीच कोपरगाव येथील माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे कट्टर समर्थक भावेश रामचंद्र थोरात यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली असून थोरात यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

जाहिरात

भावेश थोरात हे सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोपरगाव शहर उपाध्यक्ष पदावर कार्यरत  त्यांनी या पदावर अतिशय उत्तम असे काम केल्याने त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा युवक उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष अमित भांगरे, प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे यांच्या शुभहस्ते देण्यात आले असून याप्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राकेश कोते, नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार आदीं सह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

नवनिर्वाचित अहमदनगर युवा जिल्हा उपाध्यक्ष भावेश थोरात यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी मला पक्षात महत्त्वाचे पद देऊन जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त करतो  व भविष्यात सर्व पक्षश्रेष्ठींसह माझे मार्गदर्शक प्रदेश प्रवक्ते  अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध जिल्ह्यात युवकांना सोबत घेत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे थोरात यांनी या प्रसंगी सांगितले.

नियुक्ती पत्र घेतांना थोरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे