केंद्रीय आरोग्य व कुटुंकल्याण मंत्रालयाचे मुख्य सचिव अपुर्व चंद्रा यांची ग्रामीण रुग्णालयास भेट
केंद्रीय आरोग्य व कुटुंकल्याण मंत्रालयाचे मुख्य सचिव अपुर्व चंद्रा यांची ग्रामीण रुग्णालयास भेट
कोपरगाव विजय कापसे दि ३१ मार्च २०२४– शनिवार दि ३० मार्च रोजी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंकल्याण मंत्रालयाचे मुख्य सचिव अपुर्व चंद्रा यांनी भेट देत सर्व कामकाजाची सविस्तर माहिती घेत पाहणी करत संपूर्ण ग्रामीण रुग्णालय कोपरगावच्या एकूण कामकाजाबाबत अतिशय समाधान व्यक्त करत सर्व कर्मचारी अधिकारी यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी त्यांचा सोबत राज्याचे अतिरिक्त संचालक डॉ. बाविस्कर, नाशिक विभागीय उपसंचालक डॉ. कपिल आहेर, पुणे येथील उपसंचालक डॉ. गोविंद चौधरी, जिल्हा शल्चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे उपस्थीत होते.
या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी उपस्थित सर्वाना ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाची माहिती दिली तर वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष गुट्टे यांनी या दौऱ्याचे उत्कृष्ट नियोजन केले.
या प्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंकल्याण मंत्रालयाचे मुख्य सचिव अपुर्व चंद्रा यांनी १९८९ मध्ये कोपरगाव नगरपालिका येथे मुख्याधिकारी म्हणून काम केल्याचे आवर्जून सांगित जुन्या आठवणींना उजाळा दिला.