काळे गट

माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते यांचे निधन

माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते यांचे निधन

अंत्यविधी आज शनिवार दि ३० मार्च रोजी संध्याकाळी ९ वाजता मंजूर येथे गोदातीरी होणार
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० मार्च २०२४–  कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील रहिवासी गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर दंडवते यांचे आज सोलापुर येथे निधन झाले.ते महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागीय संचालक असल्याने मिटींग साठी सोलापूर येथे गेलेले होते.गौतम बॅंकेच्या चेअरमन पदासोबत ते दोनदा नगर जिल्हा परीषदेचे सदस्य तसेच नियोजन समिती सदस्य होते.

जाहिरात

गायत्री नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन, तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक होते आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे मोठा मित्रपरिवार त्यांचा होता कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार अशोकदादा काळे व सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांचा विशेष स्नेह होता.आपल्या आयुष्यात सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात दबदबा निर्माण करणारी व्यक्ती अचानक जाण्याने पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

जाहिरात
गौतम सहकारी बँकेचे चेअरमन, माजी जिल्हा परिषद सदस्य व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकरआण्णा दंडवते यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आहे. अतिशय मृदू स्वभाव व मोठ्या मनाचा माणूस अशी त्यांची ओळख होती. स्व. शंकररावजी काळे साहेबांपासून काळे कुटुंबाशी ते एकनिष्ठ होते. त्यांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असून मी एक विश्वासू मार्गदर्शक गमावला आहे. आम्ही सर्वजण दंडवते कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. हा आघात सहन करण्याची ताकद दंडवते कुटुंबियांना लाभो. 
आ आशुतोष काळे
कै सुधाकर दंडवते

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे