कोपरगांव सबजेल मध्ये कैद्यांनी घातला राडा ; एकास मारहाण तर ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कोपरगांव सबजेल मध्ये कैद्यांनी घातला राडा ; एकास मारहाण तर ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कोपरगांव सबजेल मध्ये कैद्यांनी घातला राडा ; एकास मारहाण तर ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कोपरगांव विजय कापसे दि २८ एप्रिल २०२४ : कोपरगांव सब जैल मध्ये कैद्यांनी घातला राडा सहा कैद्यांनी मिळून एका कैद्याला शिवीगाळ करत मारहाण करून दुखापत करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना उघडकीस झाली आहे.
आरोपी क्रमांक १) भैय्या उर्फ नयन शिंदे,२) भारत आव्हाड,३) अतुल आव्हाड ४) आकाश माकोने ५) विकी शिंदे ६) विशाल कोते या कैद्यांवर फिर्यादी दानिश शेरखा पठाण याच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगांव सबजेल मध्ये दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी हा कोपरगाव पोलीस स्टेशन गु.र.न २०९/२४ क्र.३२८,१८८,२७२,२७३ ३४ भादवी ,मध्ये अटक असून त्यास कोपरगांव येथील सबजेल मध्ये ब्यरीकेट क्रमांक ४ मध्ये ठेवले होते. त्यावेळी आरोपी क्रमांक ४ याने विनाकारण फिर्यादीस शिवीगाळ करत धक्का दिला असता फिर्यादी याने याची विचारणा केली असता इतर आरोपी यांनी फिर्यादिस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व आरोपी क्रमांक १) याने झाडूने फिर्यादीच्या हातावर,पायावर,पाठीवर,मारत दुखापत केली त्याच बरोबर आरोपी क्रमांक ६) याने कात्रीने फिर्यादीच्या अंगावर दुखापत करत जीवे मारण्याची धमकी दिली असता फिर्यादी याने कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित आरोपींन विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्या संदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.
घडलेला या घटनेनंतर इतर कैद्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कैदी जर जेल मध्ये पण सुरक्षित नसतील तर पोलीस प्रशासन नेमक करती तरी काय ? असा सवाल सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. सदरच्या झालेल्या घटनेवरून पोलीस प्रशासनाच्या कामावर एकप्रकारचे प्रश्न चिन्ह उभे राहते आहे.