आ.थोरात यांच्या उपस्थितीत सोमवारी खांडगाव येथे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ
खांडेश्वरचरणी नारळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ होणार
संगमनेर प्रतिनिधी दि २८ एप्रिल २०२४– शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवार दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी सायं. ५ वा.काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थिती खांडगाव येथील खांडेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी होणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात संगमनेर ,अकोले, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे व राहुरी मतदार संघातील काही गावांचा समावेश आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांनी मतदार संघातील विविध गावांमधून भेटी दिल्या असून नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात व शिर्डी मतदार संघात कार्यकर्त्यांनी प्रचाराचे काटेकोर नियोजन केले असून महाविकास आघाडीचे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्र पक्षही उस्फूर्तपणे काम करत आहेत.
सोमवारी सायं.४.३० वा.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खांडेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. यावेळी ५ वा. मंदिराच्या प्रांगणात भव्य सभा होणार आहे. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे ,माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, आमदार लहू कानडे, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, राष्ट्रवादीचे संदीप वर्पे, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह शिर्डी मतदार संघातील महाविकास आघाडी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तरी या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिक, युवक, कार्यकर्ते व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.