कोपरगावात आर्यवीर हॉल मध्ये मोठ्या उत्साहात ब्लॅक बेल्ट कॅम्प परीक्षा संपन्न
कोपरगावात आर्यवीर हॉल मध्ये मोठ्या उत्साहात
ब्लॅक बेल्ट कॅम्प परीक्षा संपन्न
कोपरगावात आर्यवीर हॉल मध्ये मोठ्या उत्साहात
ब्लॅक बेल्ट कॅम्प परीक्षा संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १४ मे २०२४– कोपरगाव शहरातील आर्यविर कराटे हॉलमध्ये शुक्रवार दिनांक १० मे ते रविवार दि १२ मे या कालावधीत प्रसिद्ध कराटे प्रशिक्षक सुदर्शन पांढरे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसीय ब्लॅक बेल्ट कॅम्प व कराटे परीक्षा मोठ्या उत्साहात अहिल्यानगर, नाशिक व छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील सहभागी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
तीन दिवसीय या कराटे कॅम्पची सांगता व यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच किशोर मुरडे व वैजयंती मुरडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महर्षी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन या कराटे कॅम्प परीक्षेत अक्षीता बडजाते व हर्ष धनवटे यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना बेल्ट, सर्टिफिकेट, ट्रॉफी, नानचाकू, ट्रॅक सूट, रोख रक्कम देत सत्कार करण्यात आला तर द्वितीय क्रमांक ज्ञानदा सोनवणे तृतीय क्रमांक मिळवणारी श्रावणी गाडे यांना बेल्ट, सर्टिफिकेट, ट्रॉफी, ट्रॅक सूट, रोख रक्कम व ड्रेस तर वैष्णवी इघे, प्रेम भास्कर, वैष्णवी माहेर, आदर्श भगत, तपस्या भीलारे, पार्थ खामकर, रोनक क्षत्रिय, सर्वेश शेलार, सई काटकर या यशस्वी विद्यार्थ्यांचा बेल्ट, सर्टिफिकेट, ट्रॉफी, ट्रॅक सूट देऊन गौरव करण्यात आला.
तसेच २१ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या रेफ्री परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणारी सिद्धी कवडे या विद्यार्थिनीस ट्रॉफी, सर्टिफिकेट, कराटे बॅग, ट्रॅक सूट, बेल्ट बक्षीस म्हणून देण्यात आले तर अंश गंडे ,तनिष्का जगताप, पूर्वा घाटे, श्रेयान्वी उपाध्ये, अदवीक कुमार, दिव्या दुशिंग, अथर्व पाटील, गार्गी वारुळे, अविनाश सोनवणे या यशस्वी विद्यार्थ्यांचा देखील सर्टिफिकेट, ट्रॉफी, ट्रॅक सूट, बेल्ट देऊन सन्मान करण्यात आला.
या तीन दिवसीय कराटे कॅम्प मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या आराध्य दुशिंग आणि आराध्या देसले , द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या ओजस्विनी नरोडे देवेन चव्हाण तर कैवल्य मुरडे, हर्ष लंगोटे, श्रवण शिंदे, अशीती बोरणारे, सरस ठोळे, विधी लिंभुरे, यशस्वी बडजाते, सुशांत पाटील, सेजल पटाईत, सहर्ष लाहोटी, यश गंडे, वैष्णवी लोखंडे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा देखील ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला.
तसेच अनुष्का फिरके आणि अन्वी जाधव या विद्यार्थ्यांनी रेफ्रि परीक्षेत तसेच तीन दिवसीय कराटे कॅम्प मध्ये उत्कृष्ट सरावाचे प्रदर्शन करत उपस्थितांचे मने जिंकल्याने त्यांचा देखील ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला.
या सर्व तीन दिवसीय कॅम्प मध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचे व परीक्षेच्या कालावधीत शुभम भोजने, वर्षा देठे, पुष्कर बागडे, आदित्य मोहिते आदींनी निरीक्षक म्हणून काम पाहिले तर सदरची परीक्षा व तीन दिवस कॅम्प यशस्वीतेसाठी आशुतोष भोसले, सप्तमी डहारे, शितल मंजुळ, कृष्णा सानप, रुहीयान शहा, आरुष अहिरे, सुमित जाधव, श्रवण शिंदे, तनुजा शिलेदार, यश सांगळे यांनी अथक परिश्रम घेतले तर या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ट्रॅडिशनल शोतोकॉन कराटे संघटनेच्या वतीने अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे तर या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळविण्याऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा किशोर मुरडे व वैजयंती मुरडे यांनी देखील रोख स्वरूपात बक्षीस देऊन गौरव करण्यात आला..