शुक्राचार्य ट्रस्ट
शुक्राचार्य महाराज मंदिरातील पिंडीस आंब्याची आकर्षक आरास
शुक्राचार्य महाराज मंदिरातील पिंडीस आंब्याची आकर्षक आरास
शुक्राचार्य महाराज मंदिरातील पिंडीस आंब्याची आकर्षक आरास
कोपरगाव विजय कापसे दि १४ मे २०२४– सध्या सगळीकडे वेगवेगळ्या रसरशीत सुगंधीत आंब्यांचा सीझन सुरू असून बाजारात वेगवेगळे आकर्षक आंबे पहावयास मिळत आहे याच रसरशीत आकर्षक फळांचा राजा असलेल्या आंब्याची आकर्षक अशी आरास परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मंदिरातील पुरातन पिंडीस केलेली सोमवारी पाहावयास मिळाली.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी किनारी कोपरगाव बेट भागात जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त पाहवा लागत नाही असे जगातील एकमेव परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या पुरातन शिवपिंडिस सोमवार १३ मे रोजी परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर प्रशासनाच्या वतीने आकर्षक अशी फळांचा राजा असलेल्या वेगवेगळ्या रसरशीत सुगंधी शेकडो आंब्याच्या फळांची तसेच पानाफुलांची आरास करण्यात आल्याने त्या आंब्याच्या सुगंधाने मंदिर परिसर अक्षरशः दरवळून गेला होता तर मंदिराचा गाभारा देखील आकर्षक दिसत होता त्यामुळे दिवसभर मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनाला गर्दी केली होती.