संगमनेर
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे इंद्रायणी तांदळाला जागतिक मागणी; कृषिमंत्री पदाच्या काळात इंद्रायणी तांदळाचा वाण विकसित
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे इंद्रायणी तांदळाला जागतिक मागणी; कृषिमंत्री पदाच्या काळात इंद्रायणी तांदळाचा वाण विकसित

संगमनेर विजय कापसे दि २८ फेब्रुवारी २०२५- काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी २००४ ते २०१० या सहा वर्षाच्या काळात महाराष्ट्राचे कृषिमंत्री पद सांभाळले. या कार्यकाळात महाराष्ट्र सर्वाधिक कृषी उत्पादन करणारे राज्य बनले तर तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या इंद्रायणी तांदुळाला आता जागतिक स्तरावर मोठी मागणी वाढली आहे.