मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त माता भगिनींनी लाभ घ्यावा -आ.आशुतोष काळे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त माता भगिनींनी लाभ घ्यावा -आ.आशुतोष काळे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त माता भगिनींनी लाभ घ्यावा -आ.आशुतोष काळे
कोपरगाव विजय कापसे दि १ जुलै २०२४ :- महायुती सरकार राज्यातील माता-भगिनींसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबविणार आहे. त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प मांडताना या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा मतदार संघातील जास्तीत जास्त पात्र माता भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी सर्वच घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प मांडतांना मुलींना मोफत शिक्षण, कांद्याला ३५० रुपये अनुदान, दुधाला प्रती लिटर ५ रुपये अनुदान, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी केलेल्या उपाय योजना, बेरोजगारांसाठी देखील विविध योजना असे महत्वाचे असे एक ना अनेक निर्णय घेवून माता-भगिनींसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” हि अत्यंत महत्वाची योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना महिन्याकाठी एक हजार पाचशे रुपये मिळणार असून या योजनेचे अर्ज भरण्यास सोमवार (०१ जुलै) पासून प्रारंभ झाला आहे. हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात सादर करावा लागणार असून पोर्टल,मोबाइल अॅप,सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाणार आहेत.परंतु ज्या माता भगिनींना अर्ज करता येत नाही त्यांना आवश्यक कागद पत्रांसह अंगणवाडी केंद्रात जावून देखील आपला अर्ज भरता येणार आहे.
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असून महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत आहेत त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. हि योजना ०१ जुलै पासून सुरु झाली असून पात्र महिलांचे आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यात या योजने अंतर्गत थेट एक हजार पाचशे रूपये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड , उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक आणि फोटो आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.ज्या महिलांना या योजनेचा अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असतील त्या माता भगिनींनी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करून या योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व माता भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.