त्रिशा फाउंडेशन च्या वतीने तळेगाव मळे शाळेस शालेय साहित्य व लॅपटॉपची भेट
त्रिशा फाउंडेशन च्या वतीने तळेगाव मळे शाळेस शालेय साहित्य व लॅपटॉपची भेट
त्रिशा फाउंडेशन च्या वतीने तळेगाव मळे शाळेस शालेय साहित्य व लॅपटॉपची भेट
कोपरगाव विजय कापसे दि १ जुलै २०२४– नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले मुंबई येथील त्रिशा फाउंडेशन यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व लॅपटॉप भेट देत एक हात मदतीचा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा विकासाला या म्हणी प्रमाणे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी याकरीता छोटेसे पाऊल टाकले आहे.
मुंबईतील त्रिशा फाउंडेशन चे सर्वेसर्वा श्री व सौ डॉ सतिष बेहडे यांनी कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथील इयत्ता पहिली ते सातवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप द्वारे नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करता यावा याकरिता नवीन लॅपटॉप देखील शाळेला भेट म्हणून दिले आहे.
या प्रसंगी तळेगाव मळे शाळेचे शिक्षक बापूसाहेब हजारे यांनी त्रिशा फाउंडेशनच्या कार्याची माहिती उपस्थितीतांना दिली तर शाळेचे मुख्याध्यापक सुनील ढेपले यांनी त्रिशा फाउंडेशनचे श्री व सौ बेहडे यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले. तर तळेगाव मळेचे सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षण प्रेमी नागरिक तसेच शालेय शिक्षक गोरखनाथ मगर, महेश गव्हाणे, संतोषी चव्हाण, अविनाश भिंगारदिवे,नितीन वाघ आदींनी त्रिशा फाउंडेशनचे श्री व सौ बेहडे यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.