संगमनेर

सह्याद्री संस्थेच्या  मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 10 वा योग दिन साजरा

सह्याद्री संस्थेच्या  मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 10 वा योग दिन साजरा
सह्याद्री संस्थेचे डी.के.मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव पान  ता.संगमनेर येथे 10 वा योग दिन साजरा
जाहिरात

संगमनेर  प्रतिनिधी दि २१ जुन २०२४२१ जून जागतिक योगदिनाच्या निमित्ताने विद्यालयात १२०० विद्यार्थ्यानी मेडिकल सिम्बॉल मध्ये विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून सर्व विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली. आज सर्व जगामध्ये योग दिन साजरा होतो आहे. २१ जून हा दिवस योग दिन आहे याचे औचित्य साधून नियमित योगा केल्यास आजारापासून दूर राहता येईल मानवाला सशक्त ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे औषध घ्यावे लागतात. दवाखान्यापासून मानवाला लांब राहण्यासाठी योगाची नितांत गरज आहे नियमित योगासने केल्यास मानवाचे शरीर सशक्त लवचिक व बलवान बनते याचाच प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मेडिकल सिम्बॉल च्या रचनेत मानवी साखळी तयार करून विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली . ही संकल्पना विद्यालयातील क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर व कलाशिक्षक सत्यानंद कसाब  यांनी साकारली . त्यांना प्रा भिमराज काकड ,भारत सोनवणे,सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. योगशिक्षक  बाळासाहेब कांडेकर यांनी विद्यार्थ्यांना योगा प्रात्यक्षिके करून दाखवली.

जाहिरात

यावेळी प्राचार्य साहेबराव कोल्हे उपमुख्याध्यापक. प्रताप आहेर पर्यवेक्षिका संगिता  रनशुर ज्युनिअर कॉलेज इन्चार्ज प्रा.बाबा  गायकवाड.प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव पानचे डॉ गायकवाड , आरोग्य सेविका व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  यांनीही योग प्रात्यक्षिके केली . कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग विवेक काशीद यांनी केले.सूत्र संचालन श्री दये पी.के यांनी केले.

जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे