सह्याद्री ज्युनिअर कॉलेज मध्ये कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांकरीता व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न
सह्याद्री ज्युनिअर कॉलेज मध्ये कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांकरीता व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न
सह्याद्री ज्युनिअर कॉलेज मध्ये कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांकरीता व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न

संगमनेर प्रतिनिधी दि १७ जुलै २०२४ – भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अमृतवाहिनी एम.बी.ए. कॉलेजच्या विभागप्रमुख तसेच सह्याद्री ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी डॉ. वृषाली वसंत साबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावरती कॉलेजचे प्राचार्य के. जी. खेमनर सर, उपप्राचार्य प्रा. संजय सुरसे सर, शिक्षक प्रतिनिधी प्रा. जी. एल. गुंजाळ, प्रकल्प प्रमुख प्रा. एन. एस. गुंड, कॉमर्स शाखेचे प्रमुख प्रा. ए. के. दातीर व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

कॉमर्स शाखेच्या श्रुती देशमुख, साक्षी दळवी, सार्थक सस्कर हे विद्यार्थी सी. ए. इंटरमिजिएट परीक्षा नुकतीच पास झाले त्याबद्दल त्यांचा सन्मान देखील करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी प्रा. एन. एस. गुंड सर यांनी प्रास्ताविक केले, प्राचार्य के. जी. खेमनर सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले तसेच सी.ए. इंटरमिजिएट परीक्षेत यशस्वी गुणसंपादन केल्याबद्दल कॉमर्स शाखेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

डॉ. वृषाली साबळे यांनी समाजातील ज्वलंत मुद्दयांवरती आपले मत मांडले. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून आपल्या आयुष्याचे स्वप्न साकार केले पाहिजे. आपले स्वप्न वेळेत निश्चित करून यशस्वी आयुष्य घडविणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे स्वॉट अन्यालिसीस वरती वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. ज्योती रायते, प्रा. जोस्ना वाकचौरे, प्रा. माधुरी भुसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन अनुष्का दिघे व प्रज्ञा झोडपे यांनी केले तर प्रा. वैशाली गुळवे यांनी आभार व्यक्त केले.