उजनी टप्पा दोनचे जुने ट्रान्सफॉर्मर कुठे गेले ? – रावसाहेब थोरात
उजनी टप्पा दोनचे जुने ट्रान्सफॉर्मर कुठे गेले ? – रावसाहेब थोरात
कोपरगाव विजय कापसे दि ४ ऑगस्ट २०२४–उजनी टप्पा एक माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या माध्यमातून सुरू झाल्याने उशिरा जाग आलेले विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी टप्पा दोन सुरू करा असे सांगितल्याचे प्रसार माध्यमात टाकले गेले मात्र त्यात आ.आशुतोष काळे यांनी तुम्हाला आता टप्पा दोनचा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला आहे असे वक्तव्य केल्याने उजनी लाभक्षेत्रातील गावांना नक्की पूर्वी कार्यरत असलेला ट्रान्सफॉर्मर कुठे गेला असा प्रश्न पडला आहे. टप्पा दोनसाठी जर नवीन ट्रान्सफॉर्मर दिला असे मत आमदार महोदयांचे असेल तर पूर्वीचा चोरीला गेला अशी काही तक्रार केली आहे का ? असा सवाल रावसाहेब (बंडू) थोरात यांनी केला आहे.
या योजनेसाठी नेमण्यात आलेला ठेकेदार कुणाच्या मर्जीतील आहे.लाखो रुपयांचा ट्रान्सफॉर्मर सुरक्षित नसेल तर या योजनेला येणाऱ्या अडचणींची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.सद्या असलेला ट्रान्सफॉर्मर हा भाडेतत्त्वावर आहे का ? पुन्हा तो परत नेला गेला तर टप्पा दोन अडचणीत आल्यास त्यासाठी ठेकेदार जबाबदार का धरू नये ? योजनेच्या मालमत्तेची जबाबदारी असताना कुणाच्या अखत्यारीतून असे प्रकार घडत आहे याचे उत्तर नागरीकांना अपेक्षित आहे.
कुणाच्या राजाश्रयाने जनतेचे नुकसान करून दिखावा करणारे श्रेय घेतले जाते आहे. ठेकेदाराने मूळ ट्रान्सफॉर्मर कुठे आहे ? हे सांगावे किंवा तो कधी कार्यान्वित होईल आणि जर आमदारांनी दुसरा दिला असेल तर पहिला कुठे गेला आहे याचा खुलासा होणे आवश्यक आहे असे आवाहन रावसाहेब थोरात यांनी केले आहे.