आत्मा मालिक हॉस्पिटल
आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये तब्बल ७ महिने सुरू राहणार मोफत आरोग्य तपासणी व अल्प खर्चात उपचार- अध्यक्ष सूर्यवंशी
आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये तब्बल ७ महिने सुरू राहणार मोफत आरोग्य तपासणी व अल्प खर्चात उपचार- अध्यक्ष सूर्यवंशी
जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन
कोपरगाव विजय कापसे दि २१ डिसेंबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील प्रसिध्द कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट संचलित
आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून पुढे तब्बल ७ महिने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले असून या शिबिरात सर्वच रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि सर्व प्रकारचे उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध केल्या असल्याची माहिती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आत्मा मालिक हॉस्पिटल, कोकमठाणचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवशी यांनी दिली आहे.
तर शिबिर सुरु झाल्यापासुन अवघ्या २० दिवसात ८३७ गरजू रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेतला आहे. तर सदरचे मोफत शिबिर २१ जुन २०२५ पर्यंत म्हणजे जागतिक योग दिनापर्यंत चालणार असुन या शिबिराचा लाभ गरजू ३५ हजार रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे उद्दीष्ट ट्रस्टचे असल्याचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी या प्रसंगी सांगितले आहे.
या शिबिरात तपासण्या व सुविधा:• बी.पी., शुगर, सामान्य आरोग्य तपासणी• एक्स-रे, रडी इको, अॅन्जीओग्राफी (गरजेनुसार)• दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार• नेत्र तपासणी• लॅब नामण्या (CBC, BSL)शिबिर कालावधीत सवलतीचे दर:* एक्स-रे (सर्व प्रकारचे) फक्त१००/- रुपयांत* सोनोग्राफी (सर्व प्रकारची) फक्त४००/- रुपयात
केसपेपर (सर्व इनहाऊस व स्पेशालिस्ट डॉक्टरांचे) – मोफत
अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी, बायपास सर्जरी मोफत
औषधावर २० टक्के सवलत
CT Scan & Lab- ५० टक्के सवलतीच्या दरात
NICU सेवा पूर्णपणे मोफत
जनरल वॉर्ड विभागाअंतर्गत चार्जेसवर ५० टक्के सवलत
हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा :-• एक्स-रे, सि.टी. स्कॅन, सोनोग्राफी• चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथलॅब, डायलिसिस मशिन.• फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा उपलब्ध• आय.सी.यू. (१८ बेड), एन.आय.सी.यू. (१८ बेड)* १०० खाटांचे अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
तरी जास्तीत जास्त गरजू नागरिकांनीया संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आत्मा मालिक हॉस्पिटल, कोकमठाणचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, व्यवस्थापक सुनिल पोकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन पाटील आदींनी केले आहे.