थोरात कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील ऊसास ३ हजार रुपयांची पहिली उचल जाहीर
थोरात कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील ऊसास ३ हजार रुपयांची पहिली उचल जाहीर
संगमनेर विजय कापसे दि २१ डिसेंबर २०२४–काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्या कडून सन २०२४-२५ या गळीत हंगामासाठी येणाऱ्या कार्यक्षेत्रातील ऊसास प्रति टन २८०० व २०० रुपये ऊसविकास अनुदान याप्रमाणे ३००० रुपये ॲडव्हान्स प्रति टन भाव देण्यात येणार असल्याची माहिती राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना बाबासाहेब ओहोळ म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर कारखान्याची वाटचाल सुरू असून या कारखान्याने कायम उच्चांकी की भाव देताना शेतकरी ,ऊस उत्पादक, कामगार यांच्या जीवनात समृद्धी निर्माण केली आहे. काटकसर, पारदर्शकता आणि आधुनिकीकरण या तत्त्वांचा वापर केल्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर कारखान्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत .कारखान्याच्या कामकाजावर कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद आणि कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक यांचाही कायम मोठा विश्वास राहिला आहे.
यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून निळवंडे धरणाचे जनक बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून डावा व उजवा कालवा ही पूर्ण झाला आहे. वितरिकांच्या कामासाठीही लोकनेते बाळासाहेब थोरात हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आगामी वर्षांमध्ये कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढणार आहे
माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४-२५ या गळीत हंगामासाठी येणाऱ्या ऊसास २०० रुपये प्रमाणे ऊस विकास अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळांनी घेतला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊसास प्रति टन २८०० रुपये आणि ऊस विकास अनुदान २०० रुपये असे ३००० रुपये प्रति टन ॲडव्हान्स भाव मिळणार आहे. तर कार्यक्षेत्राबाहेरी ऊसास २८०० रुपये प्रति टन भाव मिळणार आहे
या निर्णयामुळे कार्यक्षेत्रातील सर्व सभासद, शेतकरी व ऊस उत्पादकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्व सभासद व ऊस उत्पादकांनी कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हाईस चेअरमन संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे अभिनंदन केले आहे.
माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने कायम शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांचे हित जोपासले असून तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. यावर्षीही १० लाख मे.टन पेक्षा जास्त ऊस गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सांगितले आहे