आपला जिल्हा

मुलांना शिक्षणाबरोबर आपल्या धर्माची शिकवण व संस्कार द्यावे – मधुसूदन महाराज 

मुलांना शिक्षणाबरोबर आपल्या धर्माची शिकवण व संस्कार द्यावे – मधुसूदन महाराज 
मुलांना शिक्षणाबरोबर आपल्या धर्माची शिकवण व संस्कार द्यावे – मधुसूदन महाराज 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ सप्टेंबर २०२४आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. पालकांनी मुलांना शिक्षणाबरोबर आपल्या धर्माची शिकवण व संस्कार देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन हरिभक्त परायण मधुसूदन महाराज यांनी  तालुक्यातील भोजडे येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पाचवे पुष्प गुंफताना आपण आपल्या धर्मापासून विमुक्त झालो आहोत. कर्तव्यापासून दूर गेलो आहोत याचा अर्थ आपल्या जीवनात आनंद नष्ट झाला आहे. ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्माचे संस्कार व धर्माचे पालन होणे गरजेचे आहे. आपण आपल्या धर्माचा अभ्यास करणे गरजेचे आहे तसेच धर्माशी एकनिष्ठ राहून आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे.  आपल्या मुलांना ,मुलींना धर्माचे शिक्षण देणे गरजेचे आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

जाहिरात

संतांच्या विचाराने धर्माचे पालन होते, इतिहास घडला जातो, समाजात परिवर्तन घडते, त्यांच्याच विचाराने स्वराज्य स्थापन होते. जर आपणाकडे संस्कार , संस्कृती नसेल तर धर्माविषयीचे प्रेम निर्माण होणार नाही. देशाचे रक्षण व धर्माचे पालन करायचे असेल तर आपल्या मनात संतांचे विचार रुजायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यामुळे सर्वांनी प्रांतवाद भाषावाद सांप्रदायवाद बाजूला ठेवून एका छत्राखाली एकत्र येऊन धर्मगुरूंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

जाहिरात
यावेळी संगीत साथ नकुल महाराज जाधव, रोहित महाराज ,वसंत महाराज भाकरे ,संदीप वैद्य महाराज आदींनी केली तर यावेळी रामायणाचार्य परशुराम महाराज, सरपंच सुधाकर वादे, सुनील काजळे,  दत्तात्रय सिंनगर, संभाजी सिंनगर, संजय सिंनगर ,अजय पवार यांचे सह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे