संगमनेर

भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

जाहिरात

संगमनेर प्रतिनिधी दि ६ सप्टेंबर २०२४भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. एक सामान्य शिक्षक ते देशाचे राष्ट्रपती असा बहुमत ज्यांना मिळाला ते सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या शिक्षण क्षेत्रातले एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षाप्रमाणे विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका करून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम केले.मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व विषय शिक्षक व शिक्षकेतर सेवक अशा सर्व भूमिका विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. अतिशय उत्तम प्रकारचा अध्यापन विद्यार्थ्यांनी वर्गावर केले ; त्यानंतर सामूहिक कार्यक्रम घेऊन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताच्या माजी राष्ट्रपतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.

जाहिरात

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य खेमनर के.जी. सर हे होते. त्यांनी आपल्या मनोगतात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन व कार्याचा परिचय करून दिला. त्यांच्या काही आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. आजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतातून शिक्षक म्हणून त्यांना जे अनुभव आले ते अनुभव त्यांनी विशद केले. खूप मोठ्या संख्येने आणि उत्साहाने विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. कुमारी श्वेता बाप्ते या नववीच्या विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसाचा औचित्य साधून विद्यालयाला पुस्तके भेट दिली.

जाहिरात

या कार्यक्रमासाठी उप मुख्याध्यापक  डोखे सर ,पर्यवेक्षक  पवार सर, शिक्षक प्रतिनिधी श्री दिघे ए सर,जेष्ठ शिक्षक खेमनर सर, ज्येष्ठ शिक्षिका दिघे मॅडम,  दारोळे सर, अभंग सर , औटी सर ,  नेहे सर, गायकर सर, जोर्वेकर सर , गायकवाड सर , शेळके सर, पथवे सर , काळे सर आदी सर्व शिक्षक, तसेच तसेच राहणे मॅडम, घुले मॅडम , देशमुख मॅडम, गुंजाळ मॅडम वर्पे मॅडम, जगताप मॅडम, मॅडम दातीर मॅडम शिक्षिका, शिक्षकेतर सेवक वृंद कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन दिघे सर व श्री वालझाडे सर यांनी केले. तर कार्यक्रमाचं आभार खेमनर एस एम सर यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे