‘कोपरगाव ज्यांच्या नेतृत्वाची आतुरतेने वाट पाहते असे युवानेते ‘ असा केला उल्लेख
कोपरगाव विजय कापसे दि १८ सप्टेंबर २०२४– संजीवनी महिला रेडिमेड गारमेंट क्लस्टरची पाहणी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे व राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश (काका) कोयटे यांनी केली.यावेळी बोलताना कोयटे म्हणाले की अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केलेला असून मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे व रेणुकाताई कोल्हे यांनी महिलांना स्वावलंबी करण्यासाठी अतिशय चांगले क्लस्टर सुरू केलेले आहे.कोपरगाव शहरातील बाजारपेठ ही औद्योगिक वसाहत,संजीवनी युनिव्हर्सिटी, संजीवनी कॉल सेंटरच्या माध्यमातून फुलते आहे.मोठी उलाढाल या संस्था करतात त्यासाठी व्यापारी बांधवांना हे सर्व दाखवले पाहिजे यासाठी मी निश्चित आग्रह धरनार आहे असे काका कोयटे कोपरगाव औद्योगिक वसाहत मधील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी आले असता त्यांनी प्रतिपादन केले.
जर कोपरगाव औद्योगिक वसाहत माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केली नसती तर शेकडो कोटींची उलाढाल होणारे स्थानिक उद्योजक बाहेरील शहरात गेले असते.आपल्याकडे असणारे टॅलेंट स्थानिक भूमिपुत्रांना संधी उपलब्ध करून देऊन जोपासण्याचे काम स्व.कोल्हे यांनी केले.एक व्हिजन ठेऊन नेहमी कार्य केले तेच व्हिजन मला विवेकभैय्या कोल्हे यांच्यात दिसते आहे.कोपरगाव विवेकभैय्यांच्या नेतृत्वाची वाट आतुरतेने पाहते आहे.त्यांनी आपल्या व्हिजन प्रमाणे अपेक्षित उपक्रम हाती घ्यावे व्यापारी महासंघाच्या वतीने आमचे सहकार्य असेल असेही काका कोयटे म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी शहराला आवश्यक असणाऱ्या रोजगाराचे समीकरण मांडले त्यातून संजीवनी कॉल सेंटरच्या माध्यमातून महिन्याला कोट्यावधी रुपयाची उलाढाल होते हे जाणून त्यांनी कौतुक केले.काका कोयटे यांनी कोल्हे कुटुंबाचे व्हिजन हे जनमानसांच्या विकासाचे असल्याचे मत व्यक्त केले. यावरून कोल्हे कुटुंबाने कधीही गवगवा केला नाही मात्र स्थानिक बाजापेठेत उलाढाल होण्यास संजीवनी उद्योग समूह आणि इतर सुरू असलेल्या संस्था या उत्तम प्रयत्न करतात असे मत व्यापारी वर्गात व्यक्त होते आहे.यावेळी समवेत माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे हे उपस्थित होते.