अष्टशताब्दी वर्ष निमित्त कोपरगाव तालुक्यातील रस्त्याची आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अष्टशताब्दी वर्ष निमित्त कोपरगाव तालुक्यातील रस्त्याची आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अष्टशताब्दी वर्ष निमित्त कोपरगाव तालुक्यातील रस्त्याची आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोपरगाव विजय कापसे दि १९ सप्टेंबर २०२४ – महायुती शासनाने अष्टशताब्दी वर्षनिमित्त निर्णय घेवून सर्व महानुभव संप्रदायातील प्राचीन तीर्थक्षेत्रांच्या नोंदी व सर्व पायाभूत सुविधांचा विकास करणेसाठी महायुती शासन व लोकप्रतिनिधी सहकार्य करीत असून या प्रकल्पाचा एक भाग म्हणून कोपरगाव मतदार संघातील रस्ता करावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
दिलेल्या पत्रात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, महायुती शासनाने अष्टशताब्दी वर्षनिमित्त निर्णय घेवून सर्वमहानुभव संप्रदायातील प्राचीन तीर्थक्षेत्रांसाठी विकासाच्या योजना आखल्या आहेत. कोपरगाव मतदार संघाच्या महानुभव भक्तांसाठी सर्वज्ञ अष्टशताब्दी योजनेतून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र हिंगोनी-वारी-कोकमठाण-सोनारी-चासनळी-बक्तरपुर रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यासाठी अष्टशताब्दी वर्षनिमित्त महायुती शासनाने सर्व महानुभव संप्रदायातील प्राचीन तीर्थक्षेत्रांच्या दृष्टीने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयानुसार सदरचा रस्ता करण्यात यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या पत्रात केली आहे.