के जे सोमय्या कॉलेज

सोमैया महाविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरा आणि हिंदी कथा साहित्य या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

सोमैया महाविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरा आणि हिंदी कथा साहित्य या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

सोमैया महाविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरा आणि हिंदी कथा साहित्य या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ सप्टेंबर २०२४उत्तर प्रदेश हिंदी संस्थान, लखनऊ हिंदी आणि एकूणच सर्व भारतीय भाषांच्या उत्थानासाठी कार्य करणारी एक समर्पित संस्था आहे. साहित्यिक विरासत टिकवण्याचे महत्त्वाचे कार्य आणि जबाबदारी अनेक वर्षांपासून आमची संस्था निभावते आहे. आज त्या संस्थेच्या सहकार्याने सोमय्या महाविद्यालयामध्ये ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि हिंदी कथा साहित्य’ विषयावर जो राष्ट्रीय परिसंवाद संपन्न होतो आहे, तो निश्चितच या ज्ञान परंपरेच्या अनेक पैलूंना स्पर्श करून पुढे नेईल,  याचा मला पूर्ण विश्वास आहे.” असे प्रतिपादन परिसंवादाच्या उद्घाटक आणि उत्तर प्रदेश हिंदी संस्थान लखनऊच्या संपा.  डॉ. अमिता दुबे यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ आणि के. बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच पदवीत्तर हिंदी विभाग यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिसंवादाचा उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  अशोकराव रोहमारे होते.

जाहिरात

 अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. अशोकराव रोहमारे म्हणाले की, “भारतीय ज्ञान परंपरेचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. या दीर्घ कालखंडामध्ये अनेक महत्त्वाचे ग्रंथ रचले गेले. ज्यामध्ये ऋग्वेद सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. इतर वेद, उपनिषद आणि स्मृती ग्रंथ यांचा यात समावेश होतो. या आणि इतर अनेक ग्रंथांमध्ये ज्ञानाचे विपुल भांडार भरलेले आहे. आज या चर्चासत्राच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापक या ग्रंथाच्या अस्पर्शीत पैलूंना स्पर्श करतील आणि समजून घेतील अशी आशा मी बाळगतो.

जाहिरात

परिसंवादाचे विशिष्ट अतिथी प्रो. डॉ. राममोहन पाठक (माजी कुलगुरू, दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा चेन्नई) म्हणाले की “अशोकराव रोहमारे आणि त्यांची संपूर्ण घराणं या महाविद्यालयासाठी समर्पित घराणं आहे. त्यांच्याच प्रेरणेने या महाविद्यालयांमध्ये ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि हिंदी कथा साहित्या’वर आयोजित या राष्ट्रीय परिसंवादात विचारांचे जे बीजवपन होईल ते आगामी साधनेसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. प्राचीन काळातील संस्कृत, प्राकृत, पाली आणि अपभ्रंश तसेच आधुनिक भारतीय हिंदी, मराठी आदी भाषेतील संत कबीर, तुलसीदास, ज्ञानेश्वर, नामदेव आदींच्या साहित्यातील ज्ञान हे खरे ज्ञान आहे.
उपस्थित हिंदी विद्वानांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य व्ही.सी. ठाणगे म्हणाले की “सोमैया महाविद्यालय या परिसरातील एक नामांकित महाविद्यालय असून नुकताच या महाविद्यालयाने हीरक महोत्सव पूर्ण केलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाविद्यालयाने नेत्रदीपक प्रगती केलेली असून अनेक सन्मान आणि पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थांचे महत्त्व प्रतिपादित करणारे भारतातील प्राचीन ग्रंथ आणि त्यात दडलेल्या अनेक ज्ञानात्मक रहस्यांवर चिंतन आणि मंथन व्हावे या अपेक्षेने हा परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मी करतो.”
उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक आणि अतिथी परिचय प्रोफेसर डॉ. जिभाऊ मोरे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन डॉ. संजय दवंगे यांनी केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा श्रद्धा खालकर व संशोधक विद्यार्थिनी जयश्री ठोकळे यांनी केले.
उद्घाटन सत्र समाप्तीनंतर एकूण सहा सत्र पार पडले. या सत्रांमध्ये भारतीय ज्ञान परंपरा आणि हिंदी कहानी उपन्यास तसेच प्राचीन साहित्य प्रकारांवर विस्तृत प्रकाशझोत टाकण्यात आला. यामध्ये डॉ. सतीश पावडे, डॉ. बोबडे, प्रोफेसर योगेश पाटील,  डॉ.  प्रियदर्शनी डॉ. स्वांतीकुमार चतुर्वेदी , प्रोफेसर विजय प्रसाद अवस्थी, प्रोफेसर अर्जुन चव्हाण  डॉ.  महेंद्र ठाकूरदास आधी विद्वानांचे विद्वत्ता पूर्ण व्याख्याने झाली समारोप सत्रांमध्ये विश्व हिंदी परिषदेचे महासचिव डॉक्टर विपिन कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर सोमेश्वर नगर महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य  डॉ.  देविदास वायदंडे डॉक्टर धोंडीराम पवार, प्राचार्य पुरुषोत्तम कुंदे आदी  तसेच अनेक महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

जाहिरात मुक्त

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे