जनता हातात मशाल घेऊन मोदी – शहांची हुकूमशाहीची लंका जाळील – खा. संजय राऊत
महाविकास आघाडीला राज्यात ४० पेक्षा जास्त जागा मिळतील – आमदार थोरात
भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ अकोले येथे जाहीर सभा

अकोले प्रतिनिधी दि २७ एप्रिल २०२४– प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत. धर्माच्या नावावर राजकारण करू पाहणाऱ्या भाजपने शेतकऱ्याच्या वाटेत खिळे ठोकले. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढवणाऱ्या मोदी शहांच्या हुकूमशाहीची लंका महाराष्ट्रातील जनता हातात मशाल घेऊन जाळील असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेचे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख ,संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे ,जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे ,कॉम्रेड अजित नवले, अमित भांगरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वर्पे, संभाजी ब्रिगेडचे संदीप कडलग, शिवाजी नेहे, जगदीश चौधरी, राजू पाटील, अशोक गायकवाड ,महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ ,संतोष मुर्तडक, शिवाजी शेटे, मधुकर तळपाडे, नितीन नाईकवाडी प्रमोद मंडली नंदकुमार वाकचौरे, सिताराम शेटे, भाऊसाहेब गोरडे, प्रदीप हासे, बाळासाहेब देशमुख, मंगलताई शेलार, संदीप डोंगरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात व दुसऱ्या टप्प्यात झालेल्या सर्व मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील .नांदेडची सुद्धा जागा आपण जिंकणार आहोत. धर्माच्या नावावर राजकारण करू पाहणारे मोदी शहा सध्या घाबरले असून त्यामुळे महाराष्ट्रात दररोज सभा घेत आहेत .परंतु हा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. भ्रष्टाचार ,महागाई ,बेरोजगारी महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हुकूमशाहीची लंका आता सर्वसामान्य जनता मशाल हाती घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, विरोधी उमेदवार मागील दहा वर्षात मतदार संघात कधी फिरकले नाही. जनतेच्या संपर्कात आले नाही. फक्त निळवंडे च्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यांनी एक रुपयाचा निधी कधी आणला नाही .अकोले तालुका हा वैचारिक तालुका असून घराघरांमध्ये मशाल हे चिन्ह पोहोचवा. या तालुक्यातून भाऊसाहेब वाकचौरे यांना मोठे मताधिक्य मिळणार असून शिर्डी अहमदनगर सह राज्यातून महाविकास आघाडीच्या ४० च्या पुढे जागा विजय होतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की ,मी या माती जन्मलो आहे .आणि या मातीची आयुष्यभर सेवा करणार आहे. देश सध्या वेगळ्या वळणावर चालला आहे. संविधान ,लोकशाही धोक्यात आली आहे. गोरगरीब माणूस देशोधडीला लावून फक्त भांडवलदारांसाठी काम करणारे हे सरकार आहे.शिर्डी मतदार संघात आलेले मुंबईचे पार्सल आपल्याला सर्वांना परत पाठवून द्यायचे आहे.यावेळी आमदार सुनील शिंदे, रावसाहेब खेवरे, कॉम्रेड अजित नवले आदींची भाषणे झाली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आपसह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.