आपला जिल्हा
डी पॉल पब्लिक स्कूल मध्ये राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न
डी पॉल पब्लिक स्कूल मध्ये राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न
डी पॉल पब्लिक स्कूल मध्ये राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १३ जानेवारी २०२५– कोपरगाव येथील डी पॉल पब्लिक स्कूल मध्ये शनिवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा ट्रॅडिशनल शोतोकॉन कराटे संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सुदर्शन पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर टॅक्स प्रॅक्टिशनर आणि ऑडिटर ज्ञानेश्वर धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली तर स्टडी सर्कल पॉइंट क्लासेसच्या संचालिका सुजाता धनवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाल्या. या स्पर्धेत अहिल्यानगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, नांदेड जिल्ह्यातील सुमारे २०२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपला खेळ सादर करत उपस्थितांची शाबासकी मिळविली.
स्पर्धेच्या प्रारंभी उत्कृष्ट कराटे प्रात्यक्षिक सादरीकरण आर्यवीर कराटे क्लास, टायनी टॉट्स कराटे टीम, कोळपेवाडी कराटे टीम यांनी केले तर उत्तेजनार्थ बक्षिस साईसिटी, साईकुबेर कराटे टीम तसेच शारदा स्कूल कराटे टीम या संघांना कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर धनवटे यांनी स्वतः रोख रक्कम बक्षीस म्हणून देत शुभेच्छा मिळविल्या.
तसेच कराटे प्रशिक्षक वर्षा देठे,हर्ष धनवटे यांच्या नेतृत्वात शारदा स्कूल कराटे टीम आणि टायनी टॉट्स कराटे टीम तर आशुतोष भोसले आणि साहिल पगारे यांच्या कोळपेवाडी कराटे टीम यांनी आप आपल्या स्पर्धांकाद्वारे वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये उत्कृष्ठ सांघिक पदक मिळवत प्रथम क्रमांकाचे चषक मिळविले. तर स्नेहल पांढरे , सरस थोळे , शीतल मंजुळ यांच्या आर्यवीर कराटे टीम, पुष्कर बागडे ज्ञानदा सोनवणे यांच्या साईसिटी कराटे टीम आणि आदित्य मोहिते , आरुष् आहीरे , हर्ष लंगोटे यांच्या साईकुबेर कराटे टीम यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले तसेच सप्तमी डहारे आणि पूर्वा घाटे यांच्या माळी बोर्डिंग कराटे टीम आणि तनुजा शिलेदार यांच्या गोदाव्हॅली कराटे टीम यांनी तृतीय पारितोषिक मिळवित नावलौकिक मिळविला या सर्वाना डी पॉल पब्लिक स्कूल शाळेचे प्राचार्य फादर जोमी पॉल यांच्या हस्ते तर कोपरगाव शहरातील श्रद्धानगरी भागातील सेलिब्रेशन केक शॉपीच्या संचालिका पूजा साकेत, नरोडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. तर स्पर्धेत उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केल्याबद्दल कोळपेवाडी कराटे क्लासचे सहाय्यक प्रशिक्षक साहिल पगारे यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देण्यात आला.
सदर राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून, वर्षा देठे, आशुतोष भोसले, शुभम भोजने, पुष्कर बागडे, आदित्य मोहिते, सरस ठोळे, शीतल मंजुळ, यश सांगळे, तनुजा शिलेदार, दिव्यांशी जगताप, हर्ष लंगोटे, आरूष अहिरे, श्रवण शिंदे, हर्ष धनवटे, ओवी भांडगे , देवेन चव्हाण, यश गंडे , सप्तमी डहारे, विपुल गरुड, पूर्वा घाटे, आनंदी नरोडे, स्वानंदी नरोडे यांनी काम पाहिले.. सदर राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य कल्याण वाकचौरे , डी पॉल पब्लिक स्कूलचे प्राचार्य फादर जॉमी जोसेफ, कोपरगाव शहरातील बी. एन. सी. सी. क्रिकेट बोर्डाचे सदस्य आनंद लोढा आणि किशोर मुरडे यांचे सहकार्य लाभले.