राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये शद्विका शलाका अमोल चंदनशिवे हिचे यश
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये शद्विका शलाका अमोल चंदनशिवे हिचे यश
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये शद्विका शलाका अमोल चंदनशिवे हिचे यश
कोपरगाव विजय कापसे दि १३ जानेवारी २०२५: कोपरगाव येथे १२ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या १४ व्या ट्रॅडिशनल शोटोकाँन कराटे असोसिएशन राज्यस्तरीय चॅम्पिअनशिप स्पर्धेत विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा, कोपरगावची विद्यार्थिनी व एस. एस. जी. एम. महाविद्यालयाचे पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा या विषयाचे विभाग प्रमुख अमोल चंदनशिवे यांची कन्या शद्विका शलाका अमोल चंदनशिवे हिने उल्लेखनीय यश संपादन केले.
कोपरगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातून १० संघ सहभागी झाले होते. प्रशिक्षक वर्षा देठे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता.शद्विका चंदनशिवे हिने आठ वर्षे वयोगटातून कराटे फाईट (कुमीते) प्रकारात गोल्ड मेडल व कता प्रकारात सिल्वर मेडल मिळवून नेत्रदीपक यश मिळवले.
या यशाबद्दल ट्रॅडिशनल शोटोकाँन कराटे राज्यस्तरीय अध्यक्ष प्रा. सुदर्शन पांढरे , सरचिटणीस स्नेहल पांढरे , प्रशीक्षिका वर्षा देठे , प्रशिक्षक पुष्कर बागडे, प्रशिक्षक आदित्य मोहिते प्रशिक्षक श्रवण शिंदे तसेच विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा, कोपरगाव या विद्यालयाचे मुख्याध्यापक गवळी सर उपध्यापक शेटे सर, वर्गशिक्षिका खरे मॅडम, स्कुल कमिटीचे अध्यक्ष हेमंत पटवर्धन, सचिव दिनेश दारुणकर, सदस्या ज्योती कोऱ्हाळकर दिपाली पटवर्धन,आबासाहेब पटवर्धन शिशु विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका सरिता कोऱ्हाळकर आदी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.