बुधवारी कोपरगावात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन-प्राचार्य जाधव
बुधवारी कोपरगावात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन-प्राचार्य जाधव
बुधवारी कोपरगावात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन-प्राचार्य जाधव
कोपरगाव विजय कापसे दि २४ सप्टेंबर २०२४– महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुधवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी कोपरगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय कॉलेज) भव्य मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण अंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुभाष जाधव यांनी दिली आहे.
या विषयी प्राचार्य जाधव यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील १२ वी पास बेरोजगार उमेदवारांना प्रतिमाह ६ हजार रुपये, आयटीआय किंवा पदविका उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह ८ हजार रुपये तसेच पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवारांना प्रतिमाह १० हजार रुपये विद्या वेतनावर आपल्या नजीकच्या शासकीय अथवा निमशासकीय आस्थापनेवर प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली असून या संधीचा जास्तीत जास्त पात्र उमेदवारांना लाभ व्हावा या करिता महाराष्ट्र शासन मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या वतीने सर्वच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन केले असून त्याच अनुषंगाने कोपरगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये देखील बुधवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी ठीक सकाळी १० वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून तरी जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी उपस्थित रहा या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुभाष जाधव यांनी केले आहे.