बाजारपेठ भयमुक्त झाल्यास खरेदीचा ओघ वाढण्यास मदत होईल – रेणुकाताई कोल्हे
बाजारपेठ भयमुक्त झाल्यास खरेदीचा ओघ वाढण्यास मदत होईल – रेणुकाताई कोल्हे
कोपरगाव विजय कापसे दि ४ ऑक्टोबर २०२४– कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन आयोजित भव्य ग्राहक सन्मान योजना 2024 घोषित करण्यात आली आहे.ऑनलाइन खरेदीमध्ये आपली होणारी लूट व फसवणूक टाळण्यासाठी आपली खरेदी आपल्या कोपरगावात अशी संकल्पना राबवण्यात आली आहे.ऑनलाईन खरेदी टाळून स्थानिक बाजारपेठ फुलावी यासाठी या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला असून संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे या उपस्थित राहिल्या.या उपक्रमामद्ये संजीवनी उद्योग समूह सहप्रायोजक आहे.
यावेळी बोलताना रेणुकाताई कोल्हे म्हणाल्या ऑनलाईन खरेदी करण्यासाठी ग्राहक वळू नयेत यासाठी आपल्याच बाजारपेठेत अनेक पर्यायी वस्तू उपलब्ध करून विक्री झाल्यास ऑनलाईन खरेदी करताना होणारी फसवणूक देखील टाळता येऊ शकते.संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे कुटुंब नेहमीच स्थानिक बाजारपेठ गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहे.व्यापारी महासंघ आणि किराणा असोसिएशन यांनी पुढाकार घेत सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच चांगला आहे.सर्वच लहान मोठ्या व्यापारी बांधवांनी ऑनलाईन खरेदी करताना उपलब्ध असणारे बहुपर्यायी वस्तूंचे भांडार उपलब्ध ठेवले तर अधिक जास्त ही मोहीम यशस्वी करता येईल.महिला आणि युवकांना विश्वास निर्माण करून ग्राहक ऑनलाईन कडे वळणार नाही यासाठी कुठे काय उपलब्ध आहे याची माहिती अधिक प्रसारित झाल्यास बाजारपेठ गतिमान होण्यास मदत होईल.आपली बाजारपेठ आपला अभिमान हा विचार घेऊन पुढे जाण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या.
गुन्हेगारीच्या घटना अलीकडे वाढल्या असून त्यामुळे बाजारपेठेवर त्याचा परिणाम होतो.त्यावर देखील कठोर काम होऊन सण उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था उत्तम राहील याची दक्षता घेण्याची गरज आहे.महिला भगिनी गोळीबार,अपहरण,खून,चोऱ्या अशा घटनांनी घाबरतात त्याचा थेट परिणाम खरेदीवर होतो व बाहेर जाण्याऐवजी लोक ऑनलाईन पर्याय निवडतात यासाठी या घटना देखील रोखणे आवश्यक असल्याचे मत कोल्हे यांनी व्यक्त केले.
या उपक्रमात मोटारसायकल,टिव्ही,फ्रिज,मोबाईल,नथ,मिक्सर, ओव्हन,होम थिएटर, वॉशिंग मशीन,ट्रॉली बॅग यासारखे लाखोंची भरीव बक्षिसे ठेवण्यात आली आहे.खरेदी केल्यानंतर एक कूपन नाव आणि मोबाईल नंबर टाकून भरणे आवश्यक आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार महेश सावंत,पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,मुख्याधिकारी सुहास जगताप, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे,चैताली काळे,सुधीर डागा,प्रदीप साखरे,राजेंद्र बंब,रमेश शिरोड़े, बबलू वाणी, रवींद्र पाठक, योगेश बागुल,जनार्दन कदम, विवेक सोनवणे,वैभव गिरमे, सनी वाघ, भरत मोरे, संतोष गंगवाल, तुलसीदास खूबानी,आशुतोष पटवर्धन, प्रीतम बंब, परेश उदावंत,चांगदेव शिरोडे यासह अनेक व्यावसायिक,व्यापारी महासंघाचे सर्व सदस्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.