संगमनेर

मालुंजे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ; विखे गटाला मोठे खिंडार

मालुंजे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ; विखे गटाला मोठे खिंडार
मालुंजे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ; विखे गटाला मोठे खिंडार
संगमनेर विजय कापसे दि १३ ऑक्टोबर २०२४मालुंजे या गावातील जनसेवा मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप व विखे गटाला मोठे खिंडार पडले आहे.

जाहिरात
अमृतवाहिनी सहकारी बँक येथे मालुंजे येथील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी समवेत कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, शेतकी संघाचे संचालक संतोष नागरे, मार्केट कमिटीचे संचालक संजय खरात, युवक काँग्रेसचे शेखर सोसे ,सोसायटीचे व्हा.चेअरमन सुमित सोसे ,लहानू नागरे ,कल्पेश आव्हाड, योगेश जोशी, मल्हारी ईघे आदी उपस्थित होते.

जाहिरात

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला असून आमदार थोरात यांनी कायम सर्वधर्मसमभाव जोपासत गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले आहे .सर्वांना समान संधी दिली आहे. याउलट भाजपामध्ये फक्त दडपशाही होत असून निवडणुकीसाठी वापर केला जातो. त्यामुळे जनसेवा मंडळाच्या राजेंद्र आव्हाड, संपत सोसे, संदीप डोंगरे, प्रकाश खरात,संजय साठे, भाऊसाहेब खरात, वैभव सोसे, साहेबराव सोसे,रमेश पिंपळे, सोमनाथ पिंपळे,संतोष घुगे, भिकाजी भागा घुगे, प्रवीण गाडेकर, गोविंद सोसे यांच्यासह शेकडो युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलताना संतोष नागरे म्हणाले की, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून प्रत्येक गावात आणि वाडी वस्तीवर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या योजना राबवल्या आहेत.  संगमनेर तालुका सुसंस्कृत आणि पुरोगामी विचारांचा तालुका आहे येथे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि म्हणून जनसेवा मंडळाचे अनेक कार्यकर्ते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक आहेत .यापुढेही अनेक लोक काँग्रेस पक्षात येणार आहेत.मालुंजे येथील अनेक  कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने विखे गटाला मोठे खिंडार पडले आहे.

या सर्व नवीन प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ सुधीर तांबे ,कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात,तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, बाबासाहेब ओहोळ, गणपतराव सांगळे,सुरेश थोरात,राजेंद्र चकोर, विक्रम थोरात आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे