आपला जिल्हा

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून कामकाज करावे – निवडणूक निरीक्षक अरूणकुमार

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून कामकाज करावे – निवडणूक निरीक्षक अरूणकुमार

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा

शिर्डी विजय कापसे दि २९ ऑक्टोबर २०२४आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना केंद्रीय निवडणूक निरीक्षक अरूण कुमार यांनी दिल्या.

जाहिरात

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आणि टाकळीभान येथील भरारी पथकांना भेटीप्रसंगी त्यांनी या सूचना दिल्या. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, सहाय्यक निवडणूक अधिकारी मिलिंद कुमार वाघ, नगरपरिषद मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे आदी उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी श्री.अरूणकुमार यांनी निवडणुकीचे नोंदणी कार्यालय, स्ट्रॉंग रूम, एमसीसी, कंट्रोल रूम, साहित्य विभाग, कार्यालयात असलेली सीसीटीव्ही आणि आचारसंहिता कक्षाची पाहणी केली. नियंत्रण कक्षाला भेट देऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.

जाहिरात

श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीमधील टाकळीभान येथील आचारसंहिता अंमलबजावणी भरारी पथकांना त्यांनी भेट दिली. यावेळी मुख्यधिकारी मच्छिंद्र घोलप, मंडळाधिकारी भाऊसाहेब ओहोळ, हेमंत डहाळे आदी उपस्थित होते. श्री.अरूणकुमार म्हणाले, प्रचार सभा, मिरवणुका व कार्यक्रमांवर केल्या जाणाऱ्या खर्चावर निगराणीसाठी असलेल्या पथकांनी अत्यंत बारकाईने व्हिडिओ चित्रीकरण करावे. कुठल्याही पथकाच्या माध्यमातून अथवा कुठल्याही चेकपोस्टवर कारवाई करताना अथवा तपासणी तसेच कारवाई करताना निवडणूक आयोगाच्या अपेक्षेप्रमाणे फलनिष्पत्तीवर भर देण्यात यावा. निवडणूकीच्या निमित्ताने होणाऱ्या प्रत्येक अर्थविषयक बाबींवर अत्यंत सुक्ष्मपणे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

वाहनांची तपासणी अधिक दक्षतापूर्वक करावी. पथकांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे प्रभावीपणे काम करावे. भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक गोष्टींची नोंद ठेवून सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या संपर्कात राहावे. मतदारांना प्रभावित करण्यासाठीच्या रोख रक्कम, मद्य तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस प्रतिबंध करावा. कारवाईमध्ये सातत्य ठेवावे, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी टाकळीभान व शिरसगाव येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील सोयी सुविधांची पाहणी केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे