निवडणूक निरीक्षक ताई के यांची माध्यम कक्षास भेट
निवडणूक निरीक्षक ताई के यांची माध्यम कक्षास भेट
निवडणूक निरीक्षक ताई के यांची माध्यम कक्षास भेट
अहिल्यानगर विजय कापसे दि २९ ऑक्टोबर २०२४– विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास निवडणूक निरीक्षक ताई के यांनी भेट देऊन माहिती घेतली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निवडणूक निरीक्षकांचे स्वागत केले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे समन्वयक अधिकारी डॉ. किरण मोघे, माहिती अधिकारी अमोल महाजन आदी उपस्थित होते.
ताई के यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. माध्यम संनियंत्रण, जाहिरात प्रमाणिकरण, समाजमाध्यमावरील जाहिरातींचे प्रमाणिकरण, खर्च समित्यांशी साधला जाणारा समन्वय, माध्यम केंद्राचे दैनंदीन कामकाज आदीविषयी त्यांनी माहिती घेतली. माध्यम कक्षामार्फत करण्यात येत असलेल्या नियोजनबद्ध कामकाजाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. माध्यम कक्षात दररोज येणाऱ्या विविध वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांची नोंद घेण्याची आणि जाहिरातींचे अवलोकन करण्याची पद्धत याविषयीदेखील त्यांनी जाणून घेतले.
जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मोघे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली.