काळे गट

आ. आशुतोष काळेंना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा- अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष नायकवाडी

आ. आशुतोष काळेंना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा– अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष नायकवाडी

आ. आशुतोष काळेंना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा– अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष नायकवाडी

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ नोव्हेंबर २०२४ :- शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर सर्वांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पाहिले जाते. मंत्रिमंडळाच्या विविध खात्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळतांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सरकारच्या माध्यमातून अठरा पगड जातीतील नागरिकांचे हित जपले आणि सर्व घटकांना न्याय देवून  विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. हे कोपरगावच्या पाच वर्षात झालेल्या विकासावरून दिसून येत असून यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे पाठबळ मिळाले आहे. भविष्यात कोपरगावचा असाच विकास होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बळकट करून आ.आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष आ.इद्रीस नायकवडी यांनी केले.

जाहिरात

कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितीत अल्पसंख्यांक समाज बांधवांशी प्रदेशाध्यक्ष आ. इद्रीस नायकवडी यांनी संवाद साधला याप्रसंगी बोलत होते.

जाहिरात

ते पुढे म्हणाले की, राज्यातील जनतेसाठी महायुती सरकारने जनतेसाठी विविध योजना राबविल्या असुन माझी लाडकी बहीण, महिलांना मोफत प्रवास, शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचे विज बिल सरसकट माफ करण्याचा निर्णय असे अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. राज्यातील सर्वच घटकांसाठी काम करत असतांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वच समाज घटकांचे हीत जोपासले आहे.अशा दूरदृष्टी असलेल्या नेत्याकडून कोपरगाव मतदार संघाचा जास्तीत जास्त विकास करून घेण्यासाठी आ.आशुतोष काळे यांना अल्पसंख्याक समाजाने भरभरू साथ द्यावी असे आवाहन केले.

यावेळी बोलताना आ. आशुतोष काळे  म्हणाले की, मतदार संघाच्या हितासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मतदार संघात रस्ते, विज, पाणी, आरोग्य आदी प्रश्न सोडविले आहे. यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा निधी विविध विकास कामांना मतदारसंघासाठी आणला आहे त्यामुळे मतदार संघाच्या विकासाला मोठी मदत झाली आहे. यापुढेही मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असून सर्व समाजाबरोबरच अल्पसंख्याक समाजाच्या अडचणी व प्रश्न सोडविले आहेत व यापुढील काळातही माझे काम अविरतपणे असेच सुरु राहणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक मेळाव्या प्रसंगी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष आ.इद्रीस नायकवडी व मान्यवर.

 आ. आशुतोष काळे यांनी जो न्याय इतर समाजाला दिला तोच न्याय अल्पसंख्यांक समाजाला देखील दिला आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न सुटले आहेत.कर्मवीर शंकररावजी काळे, मा.आ.अशोकराव काळे यांना देखील अल्पसंख्यांक समाजाने नेहमीच साथ दिली होती त्याप्रमाणे आ. आशुतोष काळे यांना देखील साथ दिली आहे व यापुढील काळातही सर्व अल्पसंख्यांक समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.हाजी मेहमूद सय्यद (मा.नगरसेवक)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे