काळे गट

रयत संकुलात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी नागरिक मंत्रमुग्ध

रयत संकुलात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी नागरिक मंत्रमुग्ध

रयत संकुलात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी नागरिक मंत्रमुग्ध

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २७ जानेवारी २०२५ – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ. सुशीलमाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतम पब्लिक स्कुल, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, तसेच रयत संकुलातील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, श्री. छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय आदी शाळा-महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जाहिरात

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षा विभाग व शाळेच्या एन.सी.सी.,कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून नागरिकांना मंत्रमुग्ध केले.

जाहिरात

याप्रसंगी विरपत्नी श्रीमती कांचन आहेर, कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असी.सेक्रेटरी संदीप शिरसाठ तसेच संभाजीराव काळे,राजेश हजारे, कचरू कोळपे, शिवाजीराव वाबळे, अस्थिरोग तज्ञ डॉ.दत्तात्रय कोळपे, बाळासाहेब ढोमसे, सतीश नरोडे, कारखाना व उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ, प्राचार्य सुभाष भारती, प्राचार्य नूर शेख, प्राचार्य प्रकाश चौरे, प्राचार्या सौ. हेमलता गुंजाळ, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे तसेच सर्व शाळा महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रकाश चौरे यांनी केले. सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण व रझामुराद शेख यांनी केले तर आभार मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे यांनी मानले.

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण व मान्यवर.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे