कराटे परीक्षेमध्ये शद्विका शलाका अमोल चंदनशिवे हिचे नेत्रदीपक यश
कराटे परीक्षेमध्ये शद्विका शलाका अमोल चंदनशिवे हिचे नेत्रदीपक यश
कराटे परीक्षेमध्ये शद्विका शलाका अमोल चंदनशिवे हिचे नेत्रदीपक यश
कोपरगाव विजय कापसे दि १० नोव्हेंबर २०२४– कोपरगाव येथे ७ ते ९ नोव्हेंबर २०२४ रोजी ट्रॅडिशनल शोटोकाँन कराटे असोसिएशन या संस्थेने आयोजित केलेल्या ब्लॅक बेल्ट शिबिरामध्ये विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा, कोपरगावची विद्यार्थिनी व पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा या विषयाचे अहमदनगर जिल्हा प्रशिक्षक अमोल चंदनशिवे यांची कन्या शद्विका शलाका अमोल चंदनशिवे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
कोपरगाव येथे संपन्न झालेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये एकूण १६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या शिबिरामध्ये सर्व बेल्टच्या टेक्निक, कता, कुमीते (कराटे फाईट), रेफरी परीक्षा, आत्मरक्षा टेक्निक, अशी वेगवेगळी कौशल्यांचा विकास झाला. सदर शिबिरामध्ये शद्विका चंदनशिवे हिने रेफरी परीक्षेमध्ये तिसरा नंबर मिळवून ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळवले आहे.
या यशाबद्दल ट्रॅडिशनल शोटोकाँन कराटे राज्यस्तरीय अध्यक्ष सुदर्शन पांढरे, सरचिटणीस स्नेहल पांढरे , प्रशीक्षिका वर्षा देठे , प्रशिक्षक पुष्कर बागडे, प्रशिक्षक आदित्य मोहिते प्रशिक्षक श्रवण शिंदे तसेच विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा, कोपरगाव या विद्यालयाचे मुख्याध्यापक गवळी सर उपध्यापक शेटे सर, वर्गशिक्षिका खरे मॅडम यांनी अभिनंदन केले तर स्कुल कमिटीचे अध्यक्ष हेमंत पटवर्धन व सचिव दिनेश दारुणकर सदस्या ज्योती कोऱ्हाळकर, दिपाली पटवर्धन, आबासाहेब पटवर्धन शिशु विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका सरिता कोऱ्हाळकर तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.