संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ३३१ मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ संपन्न
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ३३१ मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ संपन्न
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ३३१ मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ संपन्न
शिर्डी विजय कापसे दि १० नोव्हेंबर २०२४ : संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिली जिल्हास्तरीय तपासणी झालेल्या २८८ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ३४५ मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली. निवडणूक निरीक्षक हौलीनलाल गौईटे, निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थिती ही प्रक्रिया करण्यात आली.
संगमनेर येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज मांजरे व संतोष कोरे उपस्थित होते.
संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ३४५ बॅलेट युनिट, ३४५ कंट्रोल युनिट आणि ३७५ व्हीव्हीपॅट यंत्रांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी हिंगे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.
संगमनेर विधानसभा मतदार संघासाठी मतदान केंद्राच्या १२० टक्के प्रमाणात बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १३० टक्के प्रमाणात व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली आहेत. ही यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. दुसरी सरळमिसळ प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना स्ट्रॉंग रूममध्ये घेऊन जाऊन दाखविण्यात आली, असे श्री. हिंगे यांनी सांगितले.