अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विक्रमी गाळप करत विक्रमी भाव देण्याचा प्रयत्न व्यवस्थापन मंडळाकडून होईल- पालकमंत्री ना. विखे पाटील
अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विक्रमी गाळप करत विक्रमी भाव देण्याचा प्रयत्न व्यवस्थापन मंडळाकडून होईल- पालकमंत्री ना. विखे पाटील
अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विक्रमी गाळप करत विक्रमी भाव देण्याचा प्रयत्न व्यवस्थापन मंडळाकडून होईल- पालकमंत्री ना. विखे पाटील
लोणी विजय कापसे दि ११ नोव्हेंबर २०२४– पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचा आदर्श आणि जुन्या कार्यकर्त्यांनी सहकाराचा पाया मजबूत केल्याने आपल्या कारखान्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सक्षमपणे आधार देता आला हा आनंद मोठा आहे. अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विक्रमी गाळप करा विक्रमी भाव देण्याचा प्रयत्न हा व्यवस्थापन मंडळाकडून होईल असे प्रतिपादन पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखानाच्या अमृत महोत्सवी ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंञी आण्णासाहेब म्हस्के पाटील होते. राज्याचे माजी सचिव आणि प्रवरेचे भुमिपुत्र आबासाहेब ज-हाड, आणि शिवाजीराव जोंधळे यांच्या शुभहस्ते आणि जेष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब भोसले, रंगनाथ उंबरकर, नानाभाऊ म्हसे, श्रीराम आसावा, अब्दुल शेख, रावसाहेब लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी प्रवरा बँकेचे चेअरमन भास्करराव खर्डे, व्हाईस चेअरमन मच्छींद्र थेटे, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, आण्णासाहेब कडू, चेअरमन नंदूशेठ राठी, सुनिल जाधव, चेअरमन सौ.गीताताई थेटे, शांतीनाथ आहेर, कारखान्याचे चेअरमन कैलासराव तांबे, व्हाईस चेअरमन सतीश ससाणे, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून ७५ वर्ष हा काळ खूप मोठा असून, या काळामध्ये प्रत्येकाचा त्यागही तेवढाच महत्त्वाचा आहे. येणाऱ्या काळात एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रवरेचा भूमिपुत्र असलेल्या सनदी अधिकाऱ्यांनी या गळीत हंगामाचा शुभारंभ केला ही आपल्यासाठी खुप अभिमानाची बाब आहे. ७५ वर्षांच्या वाटचालीत अनेक चढउतार कारखान्याने पाहीले. मात्र सभासदांचा विश्वास, कामगारांचे सहकार्य आणि सहकार चळवळीशी असलेली बांधिलकी यातून प्रवरा कारखान्याची भरारी ही मोठी आहे. जिल्ह्यात आज प्रथम क्रमांकाचा भाव दिला असल्याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.
यंदाचा हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन करतांनाच अमृत महोत्सवी हंगामामध्ये वेगवेगळ्या उपक्रमातून ज्यांनी ७५ वर्षांमध्ये या कामधेनूसाठी योगदान दिले त्यांचा योग्य तो सन्मान करण्याबरोबरच सभासदांना विक्रमी भाव देण्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलतांना आबासाहेब ज-हाड यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत या भागात सहकार चळवळीच्या माध्यमातून झालेले परिवर्तन आणि या माध्यमातून झालेला विकास हा महत्त्वपूर्ण आहे. सामान्य माणसांला जोडण्याचं काम या भागांमध्ये होत आहे. अनेक कठीण प्रसंगी मध्ये प्रत्येक कुटुंबाच्या मागे उभे राहण्याचे काम विखे पाटील परिवार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजीराव जोंधळे यांनी सहकारी संस्थेच्या माध्यमातून भूमिपुत्रांचा हा सन्मान होत आहे. उच्चांकी भाव देत असताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या सहकार्याने कारखान्यावरील आयकराचा बोजा कमी करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला यासाठी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी एकत्र काम करण्याचे आवाहन करतानाच चांगल्या प्रकारचे नियोजन करून येणाऱ्या हंगामात विक्रमिक गाळप करा असे अशा शुभेच्छा दिल्या. प्रारंभी प्रस्ताविकामध्ये कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे यांनी कारखान्याचा आढावा घेत असतानाच हा हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.