माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आण्णासाहेबांचे योगदान खुप महत्वपूर्ण-ना.राधाकृष्ण विखे पाटील
माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आण्णासाहेबांचे योगदान खुप महत्वपूर्ण-ना.राधाकृष्ण विखे पाटील
माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आण्णासाहेबांचे योगदान खुप महत्वपूर्ण-ना.राधाकृष्ण विखे पाटील
लोणी विजय कापसे दि ११ नोव्हेंबर २०२४–प्रवरा परिवारांसाठी माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांचे मार्गदर्शन हे कायमचं प्रेरणा देणारे राहीले आहे. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्यानंतर जी पोकळी माझ्या आयुष्यात निर्माण झाली ती भरून काढण्याचे काम आण्णसाहेब म्हस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाने होत आहे. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांनी दिलेले योगदान खुपच महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि प्रवरा परिवाराच्या वतीने माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील आणि सौ.सुशिलाताई म्हस्के यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ना.विखे पाटील बोलत होते. यावेळी विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, व्हा.चेअरमन सतीश ससाणे, प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे, उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, चेअरमन नंदूशेठ राठी, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू, चेअरमन सौ.गीताताई थेटे यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना.विखे पाटील म्हणाले की, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे आपल्याला करता आली. प्रवरेच्या जडण घडणीमध्ये त्यांचे योगदान महत्वपुर्ण आहे. आज वयाची ८३ वर्ष पूर्ण करून ते ८४ वर्षांमध्ये पदार्पण करत असून, त्यांचे मार्गदर्शन हे कायमचं दिशादर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देतांना माजी मंत्री आण्णासाहेब मस्के पाटील यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या राजकीय वाटचालीचा इतिहास उलगडून सांगत सर्व राजकीय वाटचालीमध्ये पद्मभूषण खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभत गेले. राजकीय वाटचाल सुरु असतांना जिल्हा परिषदे पासून सुरू झालेला राजकीय प्रवास पुढे मंत्री पदापर्यंत घेऊन गेला. तीन वेळा शिर्डी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असतानाच या परिसरातील शेतकरी, शेतमजूर यांच्या हिताचे निर्णय घेत असताना आणि पाटबंधारे विभागाची धुरा सांभाळत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठीच निर्णय घेऊन विभागात निर्णय केले.
आपल्या राजकीय वाटचालीमध्ये आपल्याला अनेक चढ-उतार पाहता आले आणि हे चढ-उतार पाहत असताना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे वेळोवेळी मिळणारे अनमोल मार्गदर्शन या वाटचालीमध्ये मोलाचे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच अनिल विखे यांनी केले.