प्रवरा उद्योग समुहाच्या वतीने पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन संपन्न
प्रवरा उद्योग समुहाच्या वतीने पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन संपन्न
प्रवरा उद्योग समुहाच्या वतीने पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन संपन्न
लोणी विजय कापसे दि २७ जानेवारी २०२५–देशाच्या प्रगतीचा रथ सर्वसामान्य माणसाच्या योगदानातून पुढे जात आहे. लोकशाहीचे मुल्य जोपासून भारत देश आज जगामध्ये विश्वगुरु होण्याच्या दिशेनेही प्रगती करीत आहे. या प्रगतीमध्ये आता युवा शक्तीलाही रचनात्मक आणि विधायक कार्यातून दिशा द्यावी लागेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा समारंभ प्रवरा उद्योग समुहाच्या वतीने पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुष्मिता विखे पाटील, संचालक संजय आहेर, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ.प्रदीप दिघे, प्रवरा कृषीशास्त्र संस्थेचे संचालक डॉ.उत्तमराव कदम, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेतील एन. सी. सी, प्रवरेतील सुरक्षा पथक, स्टाऊंड गाईड यांनी मानवंदना दिली. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने सहकारातून समृध्दी या संकल्पनेतून गणेश उत्सवात सादर केलेल्या विविध कार्यक्रमांची विश्वविक्रम म्हणून नोंद झाली. त्याचे प्रमाणपत्र सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते संस्थेस प्रदान करण्यात आले. संस्थे अंतर्गत संपन्न झालेल्या बिल्डिंग प्रवरा या स्टुडन्ट एक्सो २०२४ चा पारितोषिक वितरणही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी बोलतांना सौ.विखे पाटील म्हणल्या, ७५ वर्ष या देशाची एकात्मता, अखंडता आणि सार्वभौमत्व आबाधित राखून आपल्या देशाने केलेली यशस्वी वाटचाल ही सुध्दा लोकशाहीच्या रुजलेल्या मुल्यांचे यश आहे. भारत देश आता जगामध्ये विश्वगुरु म्हणून ओळखला जात असून, २०४७ साला पर्यंत विकसीत राष्ट्र म्हणून भारत देशाची प्रमिमा अधिक उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशाच्या विकासाचे नवे स्वप्न साकार करताना देशातील युवा पिढीला केंद्रीभूत मानून निर्णय प्रक्रीया होत असल्याकडे लक्ष वेधून सौ.विखे पाटील म्हणाल्या की, युवा शक्तीच्या उर्जेला विधायक आणि रचनात्मक दिशेने पुढे घेवून जावे लागेल. भारतीय संस्कृती आणि परंपरेला प्राधान्य देत वसुधैव कुटुंबकम् हा संदेश संपूर्ण विश्वाला देशाने दिला, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. येणारी आव्हाने संघटीपणे स्विकारुन या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वजन कटीबध्द होवू हा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
भारत माता की जय, वंदे मातरम् चा जयघोषा बरोबरच शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींनी विविध प्रात्यक्षिक सादर केली. देशभक्तीचा संदेश देतांनाच महापुरुषाच्या कार्याचे स्मरण करीत प्रवरा शैक्षणिक, औद्योगिक, कृषि आणि सहकार संकुलात देशाचा ७६ वा. प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
प्रवरा उद्योग समुहातील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा सहकारी बॅक, पायरेन्स लोणी, ना.विखे पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय आदि ठिकाणी ध्वजवंदनाचे कार्यक्रम संपन्न झाले.
संस्थेतील विविध शाळा महाविद्यालयांनी सादर केलेला ईस्ट अँड वेस्ट इंडिया इज द बेस्ट हा सांस्कृतिक कार्यक्रम देखील प्रेक्षकांच्या दृष्टीने लक्षवेधी असाच ठरला. विशेषता: पद्मश्री विखे पाटील कर्णबधीर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांना विशेष भावला.