एस. एस. जी. एम. महाविद्यालयात संविधान अमृत महोत्सव साजरा
एस. एस. जी. एम. महाविद्यालयात संविधान अमृत महोत्सव साजरा
एस. एस. जी. एम. महाविद्यालयात संविधान अमृत महोत्सव साजरा
कोपरगाव विजय कापसे दि २७ नोव्हेंबर २०२४:- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ साजरा करण्यात आला. दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करून दि. २६ जानेवारी १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू केली. भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झालेले आहेत. या निमित्ताने सांस्कृतिक विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाचे तत्वज्ञान, मूल्य, आदर्श व संविधान निर्मितीचा उद्देश स्पष्ट करण्याकरिता संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या उद्देशिकेचे वाचन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले.पुढे प्राचार्य डॉ. सरोदे म्हणाले की, “भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्य याबाबत विद्यार्थी व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे.” या निमित्ताने त्यांनी भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर नवनाथ बोडके, काकासाहेब वाळुंज आदी आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले. यावेळी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे, कॉमर्स विभागाचे प्रमुख व उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, ज्येष्ठ प्रा. डॉ. मोहन सांगळे, ज्यूनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय शिंदे, प्रा. डॉ. उज्वला भोर, कार्यालयीन अध्यक्ष सुनील गोसावी, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व कार्यालयीन सेवक उपस्थित होते.