फुटबॉल स्पर्धेत एस. एस. जी. एम. महाविद्यालयाचे घवघवीत यश
फुटबॉल स्पर्धेत एस. एस. जी. एम. महाविद्यालयाचे घवघवीत यश
फुटबॉल स्पर्धेत एस. एस. जी. एम. महाविद्यालयाचे घवघवीत यश
कोपरगाव विजय कापसे दि २७ नोव्हेंबर २०२४:- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, अहमदनगर कोश विभाग समिती व एस.एस.जी.एम. महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धा (मुली) आयोजित केलेल्या होत्या.
या स्पर्धेत मोरे अस्मिता, बनकर आस्था, हर्षदा बोरसे, गौरी कळसकर, किमया भागवत, मयुरी गायकवाड, पूजा खटकाळे या विद्यार्थिनींना घवघवीत यश मिळाले. त्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विजेत्या स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी हार्दिक अभिनंदन केले.
या विद्यार्थिनींना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विशाल पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या विजेत्या स्पर्धकांचे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन अँड. भगीरथ शिंदे व सर्व सदस्य तसेच प्राध्यापक, कार्यालयीन सेवक यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.