कोपरगाव शहरात रस्ताकॉंक्रिटीकरण व सुशोभीकरणासाठी दीड कोटी रुपये मंजूर
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या पाठपुराव्याला यश

कोपरगाव विजय कापसे दि २६ नोव्हेंबर २०२४ – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी विकासाला गती देण्यासाठी विविध नगरपंचायतींना नगरविकास मंत्रालया अंतर्गत निधी दिला आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधांच्या कामासाठी कोपरगाव नगरपरिषदेला दीड कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.कोपरगाव शहरात रस्ताकॉंक्रिटीकरण व सुशोभीकरणासाठी हा दीड कोटी रुपयांच्या निधीचा वापर केला जाणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या पाठपुरावामुळे हा निधी मिळाला असल्याचे कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.



असे एकूण दीड कोटी रुपयांचा निधी या कामी खर्च होणार आहे.कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांचे कोपरगाव शहर शिवसेना, युवा सेनेच्या वतीने विमलताई पुंडे, अक्षय जाधव, अभिषेक आव्हाड, मनील नरोडे, विनोद गलांडे, मनोज राठोड, पवन गायकवाड, ज्ञानेश्वर कपिले आदींनी आभार मानले आहे



