विखे-पाटील

डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयांमध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम साजरा 

डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयांमध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम साजरा 

डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयांमध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम साजरा 

नगर विजय कापसे दि ३ डिसेंबर २०२४डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत जगभर पसरलेल्या एड्स या जिवघेण्या रोगा बद्दल जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी 1 डिसेंबर हा एड्स दिन म्हणून पाळला जातो.जागतिक एड्स दिनाचा उद्देश एचआयव्ही किंवा एड्स टाळण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता पसरवणे, एड्स किंवा एचआयव्ही ग्रस्त लोकांशी भेदभाव थांबविणे आणि लोकांना शिक्षीत करणे हा आहे.

जाहिरात

या कार्यक्रमासाठी डॉ.विखे पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल चे डॉ.डि.एम धामणे व डॉ.सौ.शुभदा अवचट प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.तसेच महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.एम.बि.धोंडे यांचे अध्यक्षतेखाली सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जाहिरात

यावेळी उपस्थितांना डॉ.धामणे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,माझे आरोग्य,माझा हक्क या थिमच्या अनुषंगाने एड्स चा इतिहास सांगुन तो होण्याची कारणे, प्रतिबंध आणि समाजामध्ये एड्स रोगाबद्दल असणारे गैरसमज दुर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांना डॉ.सौ.अवचट म्हणल्या की, एड्स रोगाबद्दल चुकीचा प्रचार व प्रसार असुन, तसेच लैंगिक संबंधांबद्दल माहिती सविस्तर पणे सांगितली.

जाहिरात

यावेळी महाविद्यालया मध्ये प्राचार्य डॉ.एम. बि.धोंडे यांनी एचआयव्ही एड्स पासून संक्रमणाचे मार्ग व प्रतिबंधात्मक उपाय तसेच व्यसनाधीन न राहता सामाजिक बांधिलकेबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.के.एस.दांगडे यांनी केले.आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ.एस.बी.राऊत यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे