शहर पोलिस कोपरगाव
खिशातील रोख रक्कम व मोबाईल चोरणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
खिशातील रोख रक्कम व मोबाईल चोरणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
खिशातील रोख रक्कम व मोबाईल चोरणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
कोपरगाव विजय कापसे दि २ डिसेंबर २०२४– कोपरगाव शहरातील रहिवाशी राजाभैया ददनिया यांच्या खिशातून बळजबरीने रोख रक्कम व मोबाईल फोन हिसकावून घेणाऱ्या विरुद्ध नुकताच कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये कोपरगाव शहरातील खडकी मशिद्द समोर राहणारे राजाभैय्या ददनिय्या यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास साई सिटी जवळ विनोद शिवाजी पाटोळे राहणार समता नगर कोपरगाव यांने फिर्यादी राजाभैय्या यास मारहाण शिवीगाळ करत बळजबरीने फिर्यादी राजाभैय्या यांच्या खिशातील रोख रक्कम ३ हजार रुपये व ५ मोबाईल फोन चोरून नेल्याच्या फिर्यादीवरून
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये विनोद पाटोळे याच्याविरुद्ध ५३४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल आर.पी.पुंड हे करत असून आरोपीकडून ५ रुपये किमतीचा चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.