आपला जिल्हा

गिरमे वस्ती शाळेत मिळते संस्कारक्षम शिक्षण’- राहुल निकम

गिरमे वस्ती शाळेत मिळते संस्कारक्षम शिक्षण’- राहुल निकम

गिरमे वस्ती शाळेत मिळते संस्कारक्षम शिक्षण’- राहुल निकम

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ डिसेंबर २०२४मिशन आपुलकी अंतर्गत जि प प्रा शाळा गिरमे वस्ती जेऊर कुंभारी शाळेतील माजी विद्यार्थी निळकंठ सरकार संजयनगचे संस्थापक राहुल निकम यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार लेखन साहित्याचे वाटप केले. ज्या शाळेत आपण घडलो त्या शाळेसाठी काहीतरी करावे,या उद्देशाने त्यांनी समाजासमोर चांगला उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला.’मराठी शाळांमधून संस्कारक्षम व गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळत असून त्या टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजे’ असे त्यांनी मनोगतातून स्पष्ट केले.

जाहिरात

यावेळी शिक्षक अनुज ढुमणे, सुदाम साळुंके यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका प्रियंका जोशी यांनी आभार मानले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे