आपला जिल्हा

सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहिर.

‘सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहिर.

सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहिर.

कोपरगाव विजय कापसे दि १९ डिसेंबर २०२४कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा २०२४ या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करत असल्याची माहिती परिक्षण समिती प्रमुख  कल्पना हेमंत गिते यांनी दिली आहे.

जाहिरात

सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अ.भा.मराठी नाट्य परिषद ,बाल रंगभूमी परिषद, अहिल्यानगर, कलाध्यापक संघ यांचे सहभागातून आणि विसपुते सराफ, धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म, एच.एम.राजपाल, सुमंगल प्लायवुड, कापसे पैठणी, पुष्पांजली शाॅपी, अग्रवाल चहा, पांडे स्विटस्, सुशांत आर्टस् ॲन्ड पब्लिसिटी यांचे सहकार्याने सालाबादप्रमाणे परंपरेनुसार १२ व्या वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कुठलेही प्रवेश शुल्क न आकारता सहभागी स्पर्धकांच्या घरासमोरील अंगणात शनिवार दि.२ नोव्हेंबर २०२४ रोजी परंपरेनुसार याही वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी पारंपारिक, निसर्गचित्र,व्यक्तीचित्र, सामाजिक विषय, भौमितिक आकार, व्यंगचित्र असे सहा विषय ठेवण्यात आले होते. स्पर्धकांनी या स्पर्धेत उस्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

जाहिरात

पारंपरिक रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) साक्षी लोहकणे, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) श्रावणी जोशी, नेहा बोरुडे, ज्योती जगदाळे, प्रणाली आहेर, ज्योती आहेर, गायत्री थोरात, साक्षी मतकर, आदिती मैले, कस्तुरी गवळी, निकिता पन्हाळे, पुष्पा खोसे, आदित्य घोरपडे, विद्या खर्डेकर, अर्चना गुंडे, सुचेता घुमरे, रेणुका निळेकर, दिव्या बाविस्कर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. निसर्ग चित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक(पैठणी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) श्रृती कानडे , विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) सुहासिनी श्रीमाळी, चैताली सपकाळ, प्रांजल रोकडे, मनस्वी निकुंभ, किर्ती वाणी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

जाहिरात

व्यक्तिचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) मंजुषा आदिक, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) सायली गव्हाळे, रुतुषा आहेर, वेदिका डगळे, साई भगत, श्रृती केकाणे, नेतल लाहोटी, सुमिती दोरकर, अंजली गोंजारे, निशा सरोदे, तेजस्विनी कुंढारे, स्वप्निल बो-हाडे, श्रुतिका राठी, रविंद्र वरोडे, हर्षदा कहार, मंगला चिखले, आदिती गगे, श्रावणी साखरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक विषय रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) प्रिषा बजाज, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) श्रावणी दळवी, भाविका केने, गौरी माळी, परिनिती माने, अर्चना मुंदडा, राजश्री बागुल यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

भौमितिक आकार रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र)आदिती नाईक, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) रुपाली आदमाने, दिपाली जाधव, ऐश्वर्या सोनवणे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. व्यंगचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) स्नेहल आव्हाड, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू ,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) खुशी हंसवाल, अंजली गवारे, आरती बाविस्कर, भाग्यश्री घोडके यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

संगीत साहित्य चित्र विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) कोमल बोरसे, प्रतिक्षा पाटेकर, श्रृती पंडोरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुष्प सजावट विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) कृष्णा बागुल यांचा सन्मान करण्यात येणार आहे. बक्षिस विजेत्यांचे सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके,प्रा. लताताई भामरे, डॉ. नीलिमाताई आव्हाड, ॲड. स्मिमाताई जोशी, प्रा.मसुदा दारुवाला, वासंतीताई गोंजारे,प्रा. प्राजक्ता (देशमुख) राजेभोसले, भाग्यश्रीताई जोशी. वासंतीताई गोजारे, प्रा.ऋतुजा कोळपकर, प्रा.राधिका तोरणे,  वर्षाताई जाधव, प्रा.ऐश्वर्या वाघमारे,सौ.गौरी वायखिंडे (मळिक), परिक्षण सहाय्य समितीचे प्रा.अनिल अमृतकर,प्रा.मतीन दारुवाला,प्रा.अतुल कोताडे,जयंत विसपुते,अमोल शिंपी, प्रा.वंदना अलई,ॲड.महेश भिडे,सौ.तेजल सोनवणे, महेश थोरात,सुमित शिंदे, अनंत गोडसे, कल्पेश टोरपे, अमोल पवार यासह सूर्यतेज संस्थेचे सदस्य कलाध्यापक संघटना,नाट्य परिषद ,कलाप्रेमी नागरिकांचे सूर्यतेज सल्लागार समिती व सर्व सदस्यांनी यांनी अभिनंदन केले आहे.

रांगोळी स्पर्धेच्या सहा प्रकारात प्रथम क्रमांक विजेते परिक्षण समितीच्या शिफारसीनुसार पुढील वर्षापासून संयोजन समिती व परिक्षण सहाय्यक सदस्य म्हणून कामकाज पहातील.आणि प्रदर्शनार्थ रांगोळी साकारतील.सर्व बक्षिस विजेत्यांच्या सन्मानाची दिनांक,ठिकाण आणि वेळ हे आयोजकांकडून विजेत्यांनापत्र/मोबाईल द्वारे कळविण्यात येईल.असे सूर्यतेजचे स्पर्धा समिती यांनी कळविले आहे.बक्षीस विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे