आपला जिल्हा
विरभद्र यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ
विरभद्र यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ
विरभद्र यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ

कोपरगाव विजय कापसे दि ३० मार्च २०२५- कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील श्री विरभद्र यात्रेचा सालाबादप्रमाणे परंपरेनुसार रविवार दि ३० मार्च रोजी गुढी पाडव्याच्या शुभदिनी गावातील जेष्ठच्या शुभहस्ते २६ एप्रिल राजी साजऱ्या होणाऱ्या यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी उपसरपंच शिवाजी जाधव, बाळासाहेब ढवळे, रावसाहेब ढवळे, भास्कर जाधव, शिवाजी करजकर, दशरथ कुहिले, भास्करशेठ शहाणे, एकनाथ कापसे, चेतन भिगारे, प्रभाकर येवले, विजय करंजकर, लक्ष्मण नेहे, शिवाजी आगवन, भरत जगताप,सतिश वानले, दैलत सैद्रे, शाम ढवळे, विजय ढेपले, रामदास मिस्तरी,राम शहाणे,सुनिल जाधव, अनिल लभडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.






