डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिक राज्यात अव्वल; २४ बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड
डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिक राज्यात अव्वल; २४ बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड
डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालिक राज्यात अव्वल; २४ बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड
कोपरगांव विजय कापसे दि २५ डिसेंबर २०२४– मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलाच्या २४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
ही परीक्षा इयत्ता ६ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. सलग दहाव्या वर्षी आत्मा मालिकचे राज्यात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून विद्यार्थी व शिक्षक यांच्या अथक परीश्रमातून हे यश मिळाले, आजपर्यंत या परीक्षेत 249 विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा नवा ऐतिहासिक विक्रम गुरुकुलाने केला आहे असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगीतले.
यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऋतुराज कारंडे, पृथ्वीराज नागरगोजे, हर्षवर्धन उंडे, ओंकार तुपे, भावेश पाचारणे, आदिती हुले, प्रांजल काळे, उन्नती सात्रस, उत्कर्ष राजपूत, शिवम पवार, पृथ्वी मापारी, रुद्रा गोसावी, युवराज राजपूत, अरविंद राठोड, धैर्यशील पवार, राम पोले, भगवान ढाकणे, शार्दुल गोरे, मनस्वी सोनवणे, रोहित साठे, श्रेयस बडे, श्लोक पवार, दिग्विजयसिंग पाटील, नाविण्या थोरात या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, पर्यवेक्षक नयना शेटे, गणेश रासने, विषय शिक्षक सोपान शेळके, अर्थव फाऊंडेशन चे नंदकिशोर भाटे, राहूल मिश्रा, शिवंम तिवारी, विशाल सिंग, प्रियान्पु कुमार, अनुशिका अस्थाना यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादांसह, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, शालेय व्यवस्थापक, सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदीनी अभिनंदन केले आहे.