आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येथे नाताळ तसेच तुलसीपूजन हा सण उत्साहात साजरा
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येथे नाताळ तसेच तुलसीपूजन हा सण उत्साहात साजरा
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येथे नाताळ तसेच तुलसीपूजन हा सण उत्साहात साजरा
येवला विजय कापसे दि २५ डिसेंबर २०२४– येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुलात गीताजयंती, ख्रिसमस नाताळ तसेच तुलसी पूजन करण्यात आले. याप्रसंगी गुरुकुलाचे प्राचार्य तुषार कापसे यांच्या हस्ते तुलसी पूजन करून सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. इ.३रीतील कृष्णाई भावसार व ईश्वरी शेजवळ या विद्यार्थिनींनी धार्मिक वारसा जपत नऊवारी पोशाखामध्ये तुळशीचे पूजन केले. ७ वी तील श्रुती महाजन ही गीतेचा श्लोक म्हणाली. सोनाली घोडके यांनी तुळशीचे महत्व व उपयोग सांगितले.
पवित्र तुळस जीवाणू आणि संघर्ष नष्ट करण्यात मदत करते. श्वसन पाचक आणि त्वचारोगांच्या उपचारांमध्ये प्रथमोपचार म्हणून तुळशीचा वापर करण्यात येतो असे त्यांनी सांगितले. तसेच अनुराधा जोरी यांनी ख्रिसमस नाताळ विषयी माहिती सांगितली त्यात त्यांनी सांगितले प्रभू येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबर रोजी नाताळ सण म्हणून साजरा केला जातो एखादा व्यक्ती सांताक्लॉज बनवून लहान मुलांना मिठाई व भेटवस्तू वाटून आनंदी करतात. प्राचार्य तुषार कापसे यांनी हिंदू धर्मात भारतीय संस्कृतीमध्ये तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे तुळस मंगलतेचे पावित्र्याचे प्रतीक आहे घराघरांमध्ये तुळशी वृंदावन अंगणात किंवा बागेत तुळशीची रोपे लावलेली असतात.विशेषतः हिंदूधर्मीय नित्यनेमाने तुळशीची पूजा करतात असे त्यांनी सांगितले. श्रीहरी विष्णूंना, विठ्ठलांना, प्रभू श्रीकृष्णांना तुळस अतिप्रिय आहे, तुळशी महत्व उपयोग आध्यात्मिक पौराणिक औषधी गुणधर्म खूप आहेत, तुळस ही कमीत कमी ८०० वेगवेगळ्या रोगांवरती वापरली जाते, तुळशी या झाडाचा प्रत्येक अवयव हा गुणधर्मयुक्त असून त्याचा घराचा आसपास ऑक्सिजन निर्मितीसाठी खूप उपयोग होतो, असे या वृक्षाची सर्वांनी पूजाअर्चा नेहमी करायला हवी, तसेच तुळशी वृंदावन प्रत्येक घराघरात असणे महत्त्वाचे असून प्रत्येक महिला भगिनीने बालीकेने तुलसी पूजन हे करावेच असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा कुमकर यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.