शुक्राचार्य ट्रस्ट
मंडलाचार्य देशपांडे सह अनेक महंतांनी घेतले शुक्राचार्य महाराजांचे दर्शन
मंडलाचार्य देशपांडे सह अनेक महंतांनी घेतले शुक्राचार्य महाराजांचे दर्शन
मंडलाचार्य देशपांडे सह अनेक महंतांनी घेतले शुक्राचार्य महाराजांचे दर्शन
कोपरगाव विजय कापसे दि २५ डिसेंबर २०२४– जगप्रसिद्ध जिथे कोणतेही शुभकार्य करण्यास मुहूर्त लागत नाही असे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र गोदावरी नदी किनारी वसलेल्या परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांचे आज बुधवार दि २५ डिसेंबर रोजी अखिल भारतीय संत समिती धर्म समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मंडलाचार्य डॉ स्वामी अनिकेत शास्ञी देशपांडे महाराज यांच्या सह अनेक महंत मान्यवरांनी दर्शन घेतले.
त्यांचा सह गोदावरी पुरोहित राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष वे. शा. सं. सतिश गुरूजी शुक्ला, भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडी चे राज्य समन्वयक रविंद्र महाजन, अखिल भारतीय संत समिती धर्म समाज महाराष्ट्र राज्य सिन्नर संयोजक प्रशांत कुलकर्णी आदींनी परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज कोपरगाव मंदिराला भेट देऊन मनोभावे पूजा आरती केले.
या प्रसंगी सर्वच महंत मान्यवरांनी मंदिर परिसराची व स्वच्छतेची स्तुती केली। यावेळी ट्रस्ट व स्थानिक व्यवस्थापन कमिटी यांचे प्रतिनिधी म्हणून मंदिर उपप्रमुख प्रसाद प-हे यांनी महंतांचे स्वागत करून व त्यांचा यथोचित सन्मान केला. याप्रसंगी श्री देशपांडे, सचिन कुलकर्णी संचालक नमस्वी भावबंध, नितिन जोशी मंदिराचे पुजारी राकेश भणगे आदी उपस्थित होते.