अज्ञानी लोकांना सन्मार्गाला लावण्याकरता साधू संताची गरज – महंत रामगिरी
अज्ञानी लोकांना सन्मार्गाला लावण्याकरता साधू संताची गरज – महंत रामगिरी
अज्ञानी लोकांना सन्मार्गाला लावण्याकरता साधू संताची गरज – महंत रामगिरी

कोपरगाव विजय कापसे दि १४ जानेवारी २०२५–
लोक सज्जन नाहीत म्हणून तर साधूची गरज आहे. साधू अज्ञानाना सन्मार्गाला लावण्याकरता येतात. लोक अज्ञानी आहेत, लोक दुर्जन आहेत म्हणून साधू संतांची गरज आहे. असे प्रतिपादन धर्माचार्य महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे.

तालुक्यातील कान्हेगाव येथे पुण्यस्मरणानिमित्त प्रवचन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी उज्जैन ( म.प्रदेश) येथील भागवताचार्य कमलनयन शास्त्रीजी महाराज ,मुद्रांक जिल्हाधिकारी उमेश शिंदे, मुख्य अभियंता राम देशमाने, बांधकाम व्यावसायिक मंगेश ढाकराव, भाजपा ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष शंतनु शिंदे, प्रा. अक्षय घोरपडे, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील जाधव, पंढरीनाथ काळे, पुरुषोत्तम केला, नाशिक येथील सहकार अधिकारी अशोक काकड, किशोर भालेराव, संदीप शेळके, अशोक खरात ,सचिन काकड ,सार्वमत चे उपसंपादक नानासाहेब शेळके आदी प्रमुख उपस्थित होते .

पुढे उपदेश करतांना म्हणाले की,भक्ती ज्ञानाचा समन्वय वारकरी संप्रदायामध्ये आहे. ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत त्या साहेबराव पाटील जगताप यांनी जीवनभर वारकरी संप्रदायाचा परमार्थ केला. परिपूर्ण असा भक्तीचा आनंद जीवनामध्ये घेता यावा हेच खरे जीवन आहे. यालाच भाग्य म्हणतात आणि याच्या करताच संसारामध्ये जन्माला यायचं असतं. जन्माला येण्याचा उद्देश काय आणि हे ज्ञान जेव्हा होतं त्याला संसाराचे दुःख नाही.आत्म्याला जन्म – मरण नाही, मरणारे शरीर आहे.शरीराला जन्म आणि मरण ही प्रक्रिया आहे.
आध्यात्मिक जीवन हेच खरं जीवन आहे ज्याच्या
जीवनामध्ये अध्यात्म आहे त्याचाच खरच जगणं आहे. अशा प्रकारे भागवत भक्ती त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली आज त्यांचं पुण्यस्मरण आहे. भगवान परमात्म्यांनी त्यांच्या आत्म्याला निश्चितच
शांती दिलेली आहे.कारण भगवान सांगतात जो माझा भक्त आहेत. जो अनन्यभावाने शरण आहे त्याचा योगक्षेम मी चालवतो.

यावेळी मधुकर महाराज,गोपाळगिरी महाराज,विजय महाराज गुंजाळ, रामभाऊ महाराज ,बाळकृष्ण महाराज, माजी सभापती मच्छिंद्र टेके, प.समिती सदस्य मधुकर टेके, शिवाजी ठाकरे, वारीचे सरपंच बद्रीनाथ जाधव ,नामदेव जाधव ,गोदावरी बायोरिफायनरीजचे संचालक सुहास गोडगे, धोत्रेचे सरपंच प्रदीप चव्हाण,कान्हेगावचे सरपंच गणेश सोनवणे ,पत्रकार बांधव व परिसरातील भजनी मंडळ आदीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी जगताप परिवाराच्या वतीने प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.




