समृद्धीच्या लोखंडी अँगलची चोरी करणाऱ्यांना कोपरगाव ग्रामिण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
समृद्धीच्या लोखंडी अँगलची चोरी करणाऱ्यांना
कोपरगाव ग्रामिण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
समृद्धीच्या लोखंडी अँगलची चोरी करणाऱ्यांना
कोपरगाव ग्रामिण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कोपरगाव विजय कापसे दि १४ जानेवारी २०२५–
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारातुन जाणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी अँगलची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन आरोपींना पोलिसांनी गजाआड करत त्यांच्याकडुन ४ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, समृद्धी महामार्गाचे सुपरवायझर मोहन विठ्ठल निगडे, यांनी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारातुन जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ६५१०० रुपये किमतीचे १८६ लोखंडी अँगल चोरीस गेल्याची तक्रार दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यानुसार तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३९५ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व याबाबत शिर्डी उपविभागीय अधिकारी शिरिष वमने व पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस तपास करत होते. सदर तपासाची चक्रे फिरवत असताना पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाला गती देत पद्धतशिरपणे सापळा रचुन सदर चोरीतील आरोपी सागर हनुमंत आहेर, वय २४ वर्ष, अशोक बळिराम आहेर, वय २९ वर्ष दोन्ही रा. आहेर वस्ती, भोजडे, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर तसेच सदर चोरीचा माल विकत घेणारा आरोपी विजय संजय मुळेकर, वय ३५ वर्ष, रा. शिवाजीनगर, दहेगाव बोलके, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर अशांना गजाआड केले आहे. सदर चोरट्यांकडून ६५ हजार रुपये किंमतीचे १८६ लोखंडी अँगल व चार लाख रुपये किंमतीची पिकअप असा ४ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवासाचा पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहे.
सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव
कलुबर्मे,उप-विभागिय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप कोळी, उप पोलीस निरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख, प्रकाश नवाळी, किसन सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुसुदन दहिफळे यांनी केली आहे.