स्व. भागचंद ठोळे यांच्या स्मरणार्थ मोफत सर्व रोग निदान उपचार शिबिरात ४६९ नागरिकांनी घेतला लाभ तर ६४ दात्यांनी केले रक्तदान
स्व. भागचंद ठोळे यांच्या स्मरणार्थ मोफत सर्व रोग निदान उपचार शिबिरात ४६९ नागरिकांनी घेतला लाभ तर ६४ दात्यांनी केले रक्तदान
कोपरगाव विजय कापसे दि १५ जानेवारी २०२५– कोपरगाव येथील ठोळे ग्रुपचे प्रसिद्ध उद्योजक स्व. भागचंद धनराज ठोळे यांच्या स्मरणार्थ कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात मोफत सर्व रोग निदान उपचार शिबिर तसेच महा रक्तदान शिबिर आयोजित केलेल्या या शिबिरात उस्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती आयोजकाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोपरगाव येथील लायन्स, लिनेस व लिओ क्लब, ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, ठोळे उद्योग समूह व प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. भागचंद धनराज ठोळे यांच्या स्मरणार्थ हे शिबिर आयोजित केले होते या शिबिरात मेडिसिन, शल्यचिकित्साका, नेत्र चिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, दंतरोग चिकित्सा, फिजिओथेरपी, मानसोपचार, एक्स-रे, रक्त व लघवी तपासणी आदी विभागातर्फे ४६९ गरजू नागरिकांच्या तपासणी करत निदान करण्यात आले असून आवश्यक त्यांना पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.